शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मगोपचे तीन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये भिन्न धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 13:18 IST

राज्यातील सर्वात जुन्या प्रादेशिक पक्षाचे नेते एकाकी पडले आहेत.

पणजी : गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने विधानसभा पोटनिवडणुकीत तीन  मतदारसंघांमध्ये तीन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. राज्यातील निवडणुकीच्या इतिहासात मगोपकडून प्रथमच ही गोष्ट घडत आहे.

पक्षाच्या दोन आमदारांनी बंड करून विधिमंडळ पक्षाच भाजपात विलीन केल्यानंतर राज्यात मगोप नेते एकाकी पडले आहेत. सुदिन ढवळीकर यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले त्यामुळे त्यांनीही भाजपला या निवडणुकीत धडा शिकवणे हे एकमेव धोरण अवलंबिले आहे. शिरोडा मतदारसंघ खुद्द मगोपचे अध्यक्ष तथा दीपक ढवळीकर हे निवडणूक लढवीत आहेत. दीपक हे सुदिन ढवळीकर यांचे बंधू आहेत. म्हापसा मतदारसंघात मगोपने काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा दिला आहे, तर मांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांना समर्थन दिले आहे. राज्यातील सर्वात जुन्या असलेल्या या प्रादेशिक पक्षाच्या तीन वेगवेगळ्या भूमिकांमुळे राजकीय विश्लेषकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

सत्तेपासून दूर असलेल्या ढवळीकर बंधूंनी आता भाजपला या निवडणुकीत धडा शिकवणे हेच उद्दिष्ट ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यात काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

गोव्यात येत्या २३ रोजी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी तसेच लोकसभेसाठी मतदान होणार आहे.दरम्यान, राज्यातील भाजपप्रणीत सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा याबाबत पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे सूत्रांनी सांगितले. अंमलबजावणीसाठी राज्यपालांना व सभापतींना पत्र द्यावे लागते. मगोपचे कार्यकर्ते उत्तर व दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. 

टॅग्स :goaगोवा