शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

डिचोली तालुक्याला पावसाचा तडाखा; अग्निशामक दलाकडून अविश्रांत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2024 11:13 IST

सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मंगळवार (दि. १४) रात्री व संपूर्ण बुधवारी यादिवशी झालेल्या विविध पडझडीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. तर मुळगाव येथे झाड पडल्याने एक स्कूटर चालक जखमी झाला. सुदैवाने थोडक्यात बचावला. 

मये आणि डिचोली येथे दोन कार गाड्यांवर मोठे वृक्ष पडल्याने मोठे नुकसान झाले. सुमारे दहा ते बारा ठिकाणी पडझड झाल्याने तसेच वाहनांची हानी झाल्याने पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती, डिचोली अग्निशामक दल कार्यालयातून देण्यात आली. कुंभारवाडा येथे उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच बोर्डे येथे विपुल गडेकर यांच्या कारवर वृक्ष पडल्याने नुकसान झाले. पाळी, डिचोली मुळगाव नावेली, कारापूर येथे झाड पडल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली होती.

बुधवारी सकाळी मुळगाव येथे वृक्ष पडल्याने दुचाकीस्वार रहमान पाशा जखमी झाला. झाड पडले त्या वेळेला वाहने ये-जा करत होती. मात्र सुदैवाने अनर्थ टळला. या दरम्यान काही वेळ वाहतूक ठप्प झाली. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यस्त असूनही घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा केला.

अग्निशामक दलाचे जवान मंगळवार सायंकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंत अविश्रांत मदत कार्यात गुंतलेले होते. अनेक ठिकाणी वृक्ष पडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. अग्निशामक दलाचे फायर स्टेशन ऑफिसर संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नायक, विठ्ठल गाड, रामदास परब, सुनील गावस, सागर कुंकळ्ळकर, आदित्य गावस, प्रदेश मोहन, अनुप नाईक, महेश नाईक, कपिल गावस, संजय उसपकर, नीलेश होळकर, गौरव नाईक आदी अग्निशामक दलाचे जवान मदत कार्यात गुंतलेले होते.

 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस