शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

मुरगावचा विकास होणारच

By admin | Updated: April 10, 2015 01:58 IST

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर या शहराचा तसेच राज्याचाही विकास होणार आहे. या रस्त्यासाठी केंद्र सरकारने आपल्या वाट्याला येत असलेली १५६ कोटी रुपये कराराप्रमाणे खात्यात जमा केलेले आहेत. या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. त्यामुळे यापुढे वास्को शहरातील प्रदूषण, तसेच अपघात होण्याची समस्या सुटणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.गुरुवारी संध्याकाळी रवींद्र भवन बायणा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दक्षिण गोव्यात बांधण्यात येणाऱ्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पाची कोनशीला बसविण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव आर. के., वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, सार्वजनिक खात्याचे प्रमुख अभियंते परिमल राय, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन सिरिल जॉर्ज, मच्छीमार खात्याचे मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, कायतू डिसिल्वा, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध विभागाचे अभियंते, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य जनरल मॅनेजर राजीव सिंग, भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाचे अध्यक्षडॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.वरुणापुरी ते मुरगाव बंदर या ८.७५ कि.मी. लांबीच्या सुमारे ५४६ कोटी रुपये खर्चून उड्डाण पुलासह बांधण्यात येणाऱ्या चौपदरी महामार्गाचा या कामात समावेश आहे.या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा महामार्ग पूर्ण झाल्यावर हा मार्ग इतर महामार्गांना जोडला जाईल, त्यामुळे मुरगाव बंदर अधिक विकसित होईल.या सोहळ््यास खास उपस्थित राहिलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणात ‘वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा रस्ता गेली १५ वर्षे रखडला होता. समस्या सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार खटखटावे लागले आणि त्यात यश मिळाले. यासाठी आमदार मिलिंद नाईक यांनी बराच पाठपुरावा केला; पण हा रस्ता पूर्ण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांना द्यावे लागेल,’ असे सांगितले.मंत्री नितीन गडकरी येणार असल्याचे कळाल्यावर काटेबायणा, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील भरती रेषेच्या आत असलेल्या बेकायदेशीर घरमालकांनी गेले २५५ दिवस मामलेदार कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केलेल्या पीडितांनी आपला मोर्चा रवींद्र भवनकडे वळविला होता; पण पोलिसांनी तो काही अंतरावर अडविला. तसेच गोवा बार्जमालक संघटना, दाबोळी विमानतळकाळ््या-पांढऱ्या टॅक्सी संघटनाआणि मुरगाव बंदर आणि गोदी कामगार संघटना आदींनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले.मुरगावचे आमदार वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिन चाटे आणि अक्षता पुराणिक भट यांनी अनुक्रमे हिंदी आणि कोकणी भाषेतून केले. (प्रतिनिधी)