पेडणे : तेरेखोल येथील नियोजित गोल्फ कोर्सला हाकलून लावण्याचा निर्धार रविवारी (दि.७) करण्यात आला. तेरेखोलजवळील हिरवे गुरुजी स्मारकाजवळ तेरेखोल राखण मंचतर्फे नियोजित गोल्फ कोर्सच्या विरोधात सभा आयोजिली होती. त्यास चांगला प्रतिसाद लाभला. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित गोल्फ कोर्सला कडाडून विरोध केलाच, शिवाय निज गोंयकारच गोल्फ कोर्सला हाकलून लावतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.तेरेखोल राखण मंचतर्फे आवाहन केल्यानंतर विविध चर्चचे फादर सभेस उपस्थित होते. तसेच सासष्टी, बार्देस, वास्को, पेडणे या भागातील नागरिक मोठ्या संख्येने आलेले होते. पाऊस, तसेच वाऱ्याची पर्वा न करता नागरिक लक्षणीय संख्येने सभेला आल्याचे जाणवले.तेरेखोल गावातील जैवविविधतेची संपदा, पारंपरिक झरे, शेती गोल्फ कोर्समुळे नष्ट होईल. त्यामुळे गोल्फ कोर्स उभारण्यापूर्वीच कशा प्रकारचा विकास कोणाला हवा आहे, याची शहानिशा करण्याचे आवाहन सामाजिक, (पान २ वर)
गोल्फ कोर्स हाकलण्याचा निर्धार
By admin | Updated: June 8, 2015 00:44 IST