शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 13:04 IST

‘राज्यघटना दिवस सांभाळा’ या घोषणोसह धरणे आंदोलन केले.

पणजी : देशभर उद्या, शुक्रवारी 68 वा  प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर देशातील लोकशाही धोक्यात असून, राज्यघटना निधर्मी बनविण्याचा डाव आखला जात असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने (सीपीआय) कंदबा बसस्थानकाजवळील क्रांती चौकात गुरुवारी ‘राज्यघटना दिवस सांभाळा’ या घोषणोसह धरणे आंदोलन केले. या आंदोलनात प्रसन्न उट्टगी, ख्रिस्तोफर फोनेस्का, सुहास नाईक, एफजी मास्कारेन्हास यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती. या आंदोलनात आयटकचे कर्मचारीही सहभागी झाले होते. 

या आंदोलनाविषयी नाईक म्हणाले की, साडेतीन वर्षांत देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे दिसत आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ असलेल्या राज्यघटनेतील ‘निधर्म’ हा शब्द काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यघटनेमुळेच लोकशाही टीकून आहे, त्यामुळे ती श्वास्वत ठेवणे गरजेचे आहे. लोकशाहीने दिलेल्या हक्कांचा गैरवापर सुरू असून देशात विभाजनाचा डाव आखला जात आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटाला विरोध करण्याच्या नावाखाली शालेय मुलांनावरही हल्ले केले जात आहे, यातून देशात अराजकता माजविण्याचा काही घटकांचा डाव आहे. या घटनेचा सीपीआय आणि आयटकच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. देशभर कम्युनिस्ट पार्टी आंदोलन करीत आहे. 

उट्टगी म्हणाले की, केंद्रातील एनडीएचे सरकार हे आरएसएसच्या तालावर चालत आहे. धान उत्पादनांना हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कुलबर्गी, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाहीत. सोशल नेटवर्किगवर स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकारही राहिला नाही. 

याप्रसंगी आंदोलनकत्र्यानी विविध घोषणांचे फलक हाती घेतले होते. आंदोलनकत्र्यानी अल्पसंख्यांक, दलितांवरील अत्याचार ताबोडतोब थांबवा, धर्मातर करण्याचा डाव थांवबा, जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमी करा, सर्व तरुणांना कामाचा हक्क मंजूर करा, बेरोजगारांना नोकरी द्या अन्यथा बेकार भत्ता द्या, निधर्मी भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करा, लोकशाही जपा-भारत सांभाळा अशा घोषणा दिल्या. 

टॅग्स :goaगोवा