शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बरखास्तीची मागणी; विरोधी आमदारांकडून राज्यपालांना निवेदन सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 09:31 IST

विरोधी आमदारांनी राज्यपालांकडे सरकार बरखास्त करून विधानसभा विसर्जित करा, अशी मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अर्थसंकल्पीय अधिवेशन घटनाबाह्य पद्धतीने मुदतपूर्व संपवण्यात आल्याचा आरोप करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांकडे सरकार बरखास्त करून विधानसभा विसर्जित करा, अशी मागणी केली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्या नेतृत्वाखाली आमदार वीरेश बोरकर, वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा यांच्या शिष्टमंडळाने राजभवनवर राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन घटनाबाह्य पद्धतीने आणि मुदतपूर्व संपविण्यात आल्याने भारतीय घटनेच्या कलम १७४, २०२, २०३ आणि २०८ चे उघडपणे उल्लंघन झाले आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या नियमांचाही भंग झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यपालांनी हस्तक्षेप करून कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

इतर राज्यांमध्ये अधिवेशने कशी?

दरम्यान, राज्यपालांच्या भेटीनंतर राजभवनबाहेर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमांव म्हणाले की, 'शेजारी महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत पोटनिवडणुका असल्या तरी तेथे विधानसभांची अधिवेशने चालू आहेत. आम्ही राज्यपालांना अधिवेशन पुन्हा बोलावण्यास सांगितले आहे. अन्यथा राष्ट्रपतींना सांगून सरकार बरखास्त करावे, अशी मागणी केली.

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, 'आम्ही सर्व विरोधी आमदार मिळून २१ खासगी विधेयके विधानसभेत मांडणार होतो. सरकारवर दबाव आल्यानेच अधिवेशन गुंडाळण्यात आले. निवडणूक आचारसंहिता लागू असताना विधानसभा अधिवेशन घेता येत नाही का? याबद्दल मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे.' 

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition Demands Government Dismissal; Petition Submitted to Governor

Web Summary : Opposition MLAs urged the Governor to dissolve the government, alleging premature termination of the budget session violated constitutional norms. They cited breaches of electoral code and requested intervention, highlighting ongoing assemblies in other states despite elections.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण