शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गृहपाठ  व दप्तरचे ओझे कमी करा, व्हायरल  परिपत्रकामुळे शिक्षण संस्था गोंधळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 21:31 IST

विद्यार्थ्यांवरील दप्तरचे ओझे तसेच गृहपाठाचे ओझे कमी करण्याचा आदेश वजा परिपत्रक सोशल मिडियावर केंद्रीय मानुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावाने व्हायरल झाल्यामुळे शैक्षणिक संस्थांत एकच गोंधळ उडाला आहे.

पणजी - विद्यार्थ्यांवरील दप्तरचे ओझे तसेच गृहपाठाचे ओझे कमी करण्याचा आदेश वजा परिपत्रक सोशल मिडियावर केंद्रीय मानुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावाने व्हायरल झाल्यामुळे शैक्षणिक संस्थांत एकच गोंधळ उडाला आहे. या  परिपत्रकाची त्वरित अंमल बजावणी करण्यात यावी असे म्हटले आहे, परंतु शिक्षण खाते या प्रकरणात अनभिज्ञ असून अद्याप तसा अधिकृत आदेश वजा सूचना मंत्रालयाकडून आली नसल्याचे म्हटले आहे. 

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या परिपत्रकात पहिली व दुसरी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊच नये असे म्हटले आहे. तसेच त्यांना  भाषा व गणित व्यतिरिक्त इतर विषयांचा अभ्यास शिकवू नये असे म्हटले आहे. तसेच हे दोन विषय आणि पर्यावरण विषय गळता इतर अभ्यास तिसरी ते पाचवी इयत्तेपर्यंत इतर विषय शिकविता येणार नाही आणि  शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके विद्यार्थ्यांना आणायला लावू नयेत असेही म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनासंबंधीही निर्बंध आहेत. पहिली ते दुसरी दीड किलोपर्यंत. तिसरी ते पाचवी २.३ किलो पर्यंत, सहावी ते सातवी ४ किलोपर्यंत, अठवी ते नववी ४.५ किलोपर्यंत आणि दहावीसाठी ५ किलोपर्यंत दप्तरचे वजन चालेल, परंतु त्या पेक्षा अधिक चालणार नाही असे म्हटले आहे. 

या परिपत्रकाविषयी विचारले असता गोव्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी अद्याप तरी मंत्रालयाकडून या संबंधी कोणतीही अधिकृत स्वरूपाची सूचना अथवा परिपत्रक खात्याला आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या कथित परिपत्रकाविषयी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही असे ते म्हणाले. तसेच दप्तरचे ओझे कमी करण्यासंबंधी यापूर्वी शिक्षण खात्याने परिपत्रक जारी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिपत्रकारवर भारत सरकार असा उल्लेख आहे व लक्ष्यद्वीप प्रशासन असाही उल्लेख असल्यामुळे त्याच्या सत्त्यतेविषयीही संभ्रम निर्माण होत आहे. असे असतानाही राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी या परिपत्रकाच्या आधारावर बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व शिक्षकवर्गही गोंधळात आहेत. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अनेकांनी शिक्षण खात्याच्या अधिकाºयांकडे फोन करण्याचा धडाका लावला होता.

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षण