शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

मद्यालयांचा इतिहास पाहूनच वेळेबाबत निर्णय : पर्रीकर

By admin | Updated: May 8, 2014 01:27 IST

पणजी : राज्यातील काही प्रमुख शहरे आणि किनारप˜ीच्या भागात पर्यटन व्यवसायाची गरज म्हणून मद्यालये पहाटे चार वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला होता. तथापि, तूर्त तो निर्णय निलंबित करण्यात आला आहे. यापुढे मद्यालयांचा इतिहास पाहूनच कोणत्या मद्यालयास वेळेबाबत किती शिथिलता द्यावी ते ठरविले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.

पणजी : राज्यातील काही प्रमुख शहरे आणि किनारप˜ीच्या भागात पर्यटन व्यवसायाची गरज म्हणून मद्यालये पहाटे चार वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला होता. तथापि, तूर्त तो निर्णय निलंबित करण्यात आला आहे. यापुढे मद्यालयांचा इतिहास पाहूनच कोणत्या मद्यालयास वेळेबाबत किती शिथिलता द्यावी ते ठरविले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.राज्यात दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर असताना मद्यालयांच्या वेळा पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आल्या होत्या. आपण ही वेळ एका तासाने कमी केली. तसेच सगळीकडेच मद्यालयांना अशी शिथिलता देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. काँग्रेस सरकारच्या काळात महिला संघटनांनी या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला नव्हता. महिला संघटनांचा आक्षेप मी समजू शकतो. त्यामुळेच नवे धोरण आखून व व्यवस्थित निकष ठरवून मगच मद्यालयांच्या वेळांबाबत परवानगी दिली जाईल. तूर्त आम्ही वेळेत शिथिलता देण्याच्या हेतूने परवाने देणे थांबविले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ज्या मद्यालयांचा रेकॉर्ड (इतिहास) चांगला आहे, ज्या मद्यालयांबाबत यापूर्वी कोणता गुन्हा घडलेला नाही, अशा मद्यालयांनाच वेळेत शिथिलता मिळेल. केवळ किनारी भागात व काही शहरांमध्येच हा निर्णय लागू केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (खास प्रतिनिधी)खाण धोरण ३० मे नंतरराज्याचे नवे खाण धोरण हे दि. ३० मे नंतर तयार केले जाईल. तत्पूर्वी सरकार त्याबाबत विचार करत नाही. खाण धोरण तयार झाल्यानंतर मग लिज वाटपांचा वगैरे विषय येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले. खाण व्यावसायिकांशी आपली नुकतीच एक बैठक झाली. अगोदर खाण कामगारांच्या नोकरीस संरक्षण द्या, त्यांचे हितरक्षण अगोदर करा, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे.