शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चिंबलला आरोग्य खात्याच्या जागेत आयटी पार्क, मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:52 IST

पणजी : आरोग्य खात्याची चिंबल येथे जी 1 लाख 79 हजार 735 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन शिल्लक राहिली होती, त्या जमिनीवर आयटी पार्क उभे राहणार आहे.

पणजी : आरोग्य खात्याची चिंबल येथे जी 1 लाख 79 हजार 735 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन शिल्लक राहिली होती, त्या जमिनीवर आयटी पार्क उभे राहणार आहे. त्यासाठी ही सगळी जमीन माहिती तंत्रज्ञान खात्याकडे सुपूर्द करावी, असा प्रस्ताव पर्रीकर मंत्रिमंडळाच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत मांडून संमत करण्यात आला. यामुळे यापुढे चिंबलला आयटी पार्कचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे.चिंबल येथे 401 आणि 403 या दोन सर्व्हे क्रमांकाच्या मिळून एकूण 4 लाख 54 हजार 025 क्षेत्रफळाच्या जागा आयटी खात्याने पाहिल्या. यापैकी 2 लाख 69 हजार 890 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा 21 मार्च 2016 रोजी माहिती तंत्रज्ञान खात्याच्या ताब्यात आली. तथापि, आयटी खात्याला बाजूला असलेली आरोग्य खात्याची जमीनही हवी आहे. आरोग्य खात्याकडे चिंबल येथील एकूण 1 लाख 84 हजार 135 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा होती. त्यापैकी 4 हजार 40 चौरस मीटर जागा ओपा जलवाहिनी टाकण्यासाठी अगोदरच सार्वजनिक बांधकाम खात्याने ताब्यात घेतली.शेवटी 1 लाख 79 हजार 735 चौ.मी. जागा आरोग्य खात्याकडे शिल्लक राहिली होती. ती आता आयटी पार्क तथा आयटी सेवाविषयक पार्कसाठी देण्याचा निर्णय बुधवारी झाला. ना नफा, ना तोटा तत्त्वावर ही जागा आरोग्य खात्याकडून आयटी खात्याकडे जाईल.पेडणो येथे कृषी खात्याने 1 लाख 6 हजार 864 चौरस मीटर जमीन 1991 साली ताब्यात घेतली होती. त्यापैकी काही जमिनीचा वापर झाला नाही. वापर न झालेल्या जागेतील पाचशे चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा कृषी खात्याने पर्यटन खात्याकडे सोपवावी व पेडणो येथे त्या जागेत स्मशानभूमीची सोय करावी असे कृषी मंत्री व पर्यटन मंत्र्यांमध्ये ठरले. 281/2 सर्व्हे क्रमांकाच्या जागेतील पाचशे चौरस मीटर जागा पर्यटन खात्याकडे सोपविण्याचा प्रस्ताव बुधवारीच मंत्रिमंडळाने मंजुर केला.दरम्यान, गोवा दंतचिकित्सा महाविद्यालय तथा इस्पितळात आणि गोमेकॉ इस्पितळात इंटर्नशिप करणा-या विद्यार्थ्यांचे दरमहा विद्यावेतन दहा हजार रुपये आहे. ते 20 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. गोवा दंतचिकित्सा महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या सतरा जागा रद्द करायच्या नाहीत, असेही ठरले व या डॉक्टरांना दरमहा 75 हजार रुपयांचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :goaगोवा