शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:29 IST

म्हापसा येथील अस्तित्व सभेत मनोज परब यांची घोषणा.

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदनिशी रिंगणात उतरण्याचा इशारा देत रिव्होल्यूशनरी गोवन्स अर्थात आरजीने काल दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार असल्याची घोषणा केली.

आरजीने यापूर्वीच उत्तरेतून मनोज परब लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाकडून काल म्हापशातील टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या अस्तित्व सभेत परब यांनी दक्षिणच्या उमेदवाराचे नाव घोषित केले.

यावेळी भाजपसह काँग्रेसवर टिका करताना लोकांनी आरजीला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले. गोव्याचे अस्तीत्व राखून ठेवण्यासाठी आज प्रत्येक गोमंतकीयाने एकत्र आले पाहिजे. त्यासाठी आरजीचे व्यासपीठ आम्ही उभे केल्याचे परब म्हणाले.

...तर पक्षच गुंडाळून ठेवेन

आरजी पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर उभा राहिला आहे. नवे नेते पक्षात तयार होत असून प्रत्येक जण लोकांच्या हितासाठी दिवस रात्र झटत आहे. गावागावात आपले कार्यकर्ते काम करत असल्याचे सांगून मते फोडण्याचा होत असलेल्या आरोपाबरोबर लोकांकडून पैसे उकळत असल्याच्या आरोपाचे परब यांनी खंडन केले. आपल्यावर केले जात असलेले आरोप सिद्ध करून दाखवल्यास आरजी पक्षच गुंडळून ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक