शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिळारीच्या पाण्याची 'डेडलाईन' हुकणार; कालव्यांची डागडुजी संथगतीने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 08:23 IST

बार्देशवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तिळारीच्या कालव्यांचे गोव्याच्या बाजूने ६ किमीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, महाराष्ट्राने डागडुजीच्या बाबतीत कामाची गती संथ ठेवली आहे. त्यामुळे येत्या २० तारखेपर्यंत निर्धारित वेळेत ते पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका आहे. पर्वरी तसेच बार्देशमधील अन्य काही भागात सध्या लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

या दुरुस्ती कामाचा सर्वात जास्त फटका पर्वरीवासीयांना बसला आहे. तिळारीहून पर्वरीतील १० एमएलडी प्रकल्पाला येणारा पाणीपुरवठा बंद झाल्यापासून गेल्या महिनाभराहून अधिक काळ हा प्रकल्प बंदच आहे. पर्वरीतील लोकांना टँकरच्या महागड्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. अनेक सरकारी कार्यालये पर्वरीत आहेत. त्यांनाही याचा फटका बसला आहे.

सरकारी वसाहती, पोलिस दलाचे गाळे, आयकर कॉलनी, टपाल व दूरसंचार वसाहतींमध्ये राहणाऱ्यांचेही पाण्याअभावी हाल झाले आहेत. सध्या अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला आमठाणे धरणातून तसेच साळ येथील शापोरा नदीतून पंप करून पाणी घेतले जाते. या प्रकल्पाला रोज १३० एमएलडी पाणी दिले जाते. चांदेलच्या १५ एमएलडी प्रकल्पाला कळणे नदीचे पाणी घेतले जाते, असे बदामी यांनी सांगितले.

सांगोल्डा, साळगाव, गिरी व इतर भागांना पर्वरीतील १० एमएलडी प्रकल्पातून पाणी पुरवले जात होते. परंतु, हा प्रकल्प पाणी नसल्याने आता बंदच आहे. पेडणे तालुक्यात मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ झाले. यामुळे चांदेल प्रकल्पातून पाण्याची मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यात तिळारीचे पाणी बंद केल्यानंतर महाराष्ट्राने कालव्यांच्या दुरुस्तीचे काम उशिरा हाती घेतले. संपूर्ण उत्तर गोव्याला पाणी पुरविणारा तिळारी प्रकल्प ३० वर्षांहून जुना अजून निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे कालवे वरचेवर फुटण्याचे प्रकार घडतात, कालव्यांच्या डागडु- जीसाठी अलीकडेच उभय राज्यांनी ३३० कोटी रुपये मंजूर केले होते.

आणखी आठवडाभर सोसा कळ : बदामी

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाण्यासाठी आणखी आठवडाभर कळ सोसावी लागेल, गोव्याच्या बाजूने तिलारीच्या कालव्यांचे ६ किमीचे दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे. कालव्यांच्या डागडुजीचे काम आम्ही युद्धपातळीवर करत आहोत. परंतु, महाराष्ट्राच्या बाजूने दुरुस्तीचे काम थोड्या संथ गतीने चालू आहे, येत्या २० डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करून २२ डिसेंबरपर्यंत तिळारीचे पाणी देण्याची व्यवस्था करण्याची हमी महाराष्ट्रातील जलस्रोत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी