शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दार्जिलिंगच्या चवदार ‘मोमोज’ची पर्यटकांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 14:39 IST

देशभरात जी विविधता, संपन्नता दिसून येते, तीच सर्वसमावेशकता गोव्यातही आहे.

ठळक मुद्दे दार्जिलिंग पद्धतीचे मोमोज देश-विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत.शाकाहारी आणि मांसाहारी मोमोज पर्यटकांसह स्थानिकांच्याही पसंतीस उतरले आहेत.खवय्यांची भूक वाढविणारे विविध भाज्यांपासून बनविलेले पौष्टिक सूप अगदी विनामूल्य दिले जाते.

धनंजय पाटील

पणजी - देशभरात जी विविधता, संपन्नता दिसून येते, तीच सर्वसमावेशकता गोव्यातही आहे. येथे देशातील सर्व राज्यांतील रहिवासी जसे गुण्यागोविंदाने नांदतात, तसेच त्यांची संस्कृती, परंपराही ते येथे जाणीवपूर्वक निभावतात. अन्य राज्यांतून आलेल्या या बांधवांनी आपले राहणीमान आणि खानपान पद्धतीही या देवभूमी गोव्यात एकजीव केली आहे. याचाच प्रत्यय दार्जिलिंगमधून आलेल्या तमांग दाम्पत्याने दाखवून दिला आहे. त्यांचे दार्जिलिंग पद्धतीचे मोमोज देश-विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

अवघ्या तीन वर्षांपूर्वी पोटा-पाण्यासाठी गोव्यात आलेले प्रताप तमांग आणि स्मृती तमांग या दाम्पत्याने व्यवसायाचा सरळधोपट मार्ग न पत्करता वेगळे काहीतरी करून दाखवण्याचे ठरविले. आणि तशी सुरुवातही केली. आज त्यांचे अंजुणा, वागातोर आणि आसगाव येथील स्टॉलवर मिळणारे शाकाहारी आणि मांसाहारी मोमोज पर्यटकांसह स्थानिकांच्याही पसंतीस उतरले आहेत.

वस्तूत: हा तिबेटीयन खाद्यपदार्थ व्हाया दार्जिलिंग असा गोव्यात आला आहे. चिकन खिम्याच्या मांसाहारी मोमोज इतकेच ताज्या भाज्यांपासून बनविलेले शाकाहारी मोमोजही खवय्यांच्या जीभेची रूच वाढवत आहेत. मैद्याच्या पिठाचे आवरण असलेले हे पांढरे मोमोज भरण्याचे काम प्रताप तमांग आणि त्यांचा सहकारी करतो. तर स्मृती तमांग या मोदकाप्रमाणेच हे मोमोज अवघ्या काही मिनिटांत उकडून डिशमधून खवय्यांसमोर सादर करतात. सोबत चवीसाठी मियोनीज, लसणाचा तिखट सॉस आणि शेंगदाण्याचा चवदार सॉसही असतो. अगदी माफक दरात एका व्यक्तीचे निश्चितच पोट भरेल, एवढे मोमोज एका डिशमध्ये असतात. त्यासोबत खवय्यांची भूक वाढविणारे विविध भाज्यांपासून बनविलेले पौष्टिक सूप अगदी विनामूल्य दिले जाते. खवय्यांची आवड-निवडही तमांग दाम्पत्य जोपासते. ज्यांना कोबी आवडत नसेल, त्यांच्यासाठी चीज, पालकपासून बनविलेले मोमोज दिले जातात.

मोमोज बनविण्याची खासियत

- हे मोमोज चवदार बनण्यामागचे गुपित स्मृती तमांग यांनी ‘लोकमत’शी बोलताना उघड केले. एरवी बाजारात कुठेही मोमोज उकळत्या पाण्यावर उकडलेले असतात. मात्र, तमांग यांच्याकडील मोमोज हे चक्क विविध भाज्यांपासून बनविलेल्या सुपाच्या आधणावर उकडले जातात. ज्यामुळे त्या भाज्यांचा अर्क मोमोजमध्ये पुरेपूर उतरतो आणि ते चवदार बनतात. ही खासियत असल्यानेच त्यांच्याकडे एकदा आलेला ग्राहक कधीच दुरावत नाही, अशी माहिती स्मृती यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाhotelहॉटेल