शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे, बनावट सीम कार्ड, ड्रग्सबाबत कठोर पावले, पश्चिम विभागीय पोलीस समन्वय बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 21:13 IST

पश्चिम विभागीय पोलीस समन्वय समितीची बैठक शुक्रवारी दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये संपन्न झाली.

पणजी- पश्चिम विभागीय पोलीस समन्वय समितीची बैठक शुक्रवारी दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये संपन्न झाली. या बैठकीत सायबर गुन्हे, बनावट सीम कार्ड, आंतरराज्य बनावट शस्रास्र परवाने या विषयांवर प्रामुख्याने झाली. फरारी असलेल्या वाँटेड गुन्हेगारांसंबंधी माहितीची देवाणघेवाण केली जावी, असे ठरले. गोव्याकडे असलेली वाँटेड गुन्हेगारांची माहिती इतर राज्यांच्या पोलिसांना देण्यात आली. गोवा पोलीस दलच या बैठकीचे यजमान होते. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर व इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीत होते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तसेच या विभागातील अन्य राज्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. राजस्थान व मध्यप्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, दमण दिवचे उपमहानिरीक्षकांनी बैठकीत भाग घेतला. कोकण रेल्वेचे पोलिस महानिरीक्षकही आले होते. विभागीय सुरक्षेच्यादृष्टीने उचलावयाच्या पावलांबाबत चर्चा झाली. गुप्तचर शाखेच्या संयुक्त संचालकांनी देशभरातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. या विभागातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. मुक्तेश चंदर यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत उघडलेल्या ट्राफिक सेंटिनल या खास मोहिमेची माहिती दिली. वॉटसअपवर वाहतूक उल्लंघनाचे फोटो किंवा चित्रफिती आल्यानंतर केलेल्या कारवाईबद्दल सविस्तर सांगितले. ड्रग्स माफियांबाबत अन्य राज्यांनी गोवा पोलिसांना आवश्यक ती माहिती पुरवावी, अशी मागणी करण्यात आली.ड्रग्सबाबत कठोर पावले गोव्याच्या अंमली पदार्थविरोधी विभागाचे पोलिस महानिरीक्षक चालू महिन्याच्या तिसºया आठवड्यात हिमाचलप्रदेशमधील कुलू येथील तसेच राजस्थानमधील अजमेर येथील पोलिस अधिक्षकांची बैठक घेऊन ड्रग माफियांना जेरबंद करण्यासाठी संयुक्त धोरण निश्चित करणार आहेत. एटीएमबाबत गुन्ह्यांवरही चर्चा अलीकडच्या काळात एटीएमबाबतचे गुन्हे वाढल्याने त्याविषयीही चर्चा झाली. एटीएम कार्ड क्लोन करुन ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढण्याच्या ज्या घटना घडत आहेत त्याबाबत चर्चा झाली. गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व बँकांना त्यांच्या एटीएम केंद्रात पुरेशी सुग़क्षा व्यवस्था ठेवण्यास बजावण्यात आले असल्याचे चंदर यांनी स्पष्ट केले. बँका तसेच विमा कंपन्यांना सतर्क करायला हवे याबाबत मतैक्य झाले. दरम्यान, आंतरराज्य गुन्हेगार टोळ्या तसेच सराईतांबाबत माहितीच्या देवाण घेवाणीसाठी या विभागातील सर्व राज्यांच्या जिल्हा अधिक्षकांची बैठक घेण्याचे तसेच संयुक्त धोरण ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेगाड्यांमध्ये होणाºया चोºयांचा विषयही चर्चेला आला. याआधी या समितीच्या बैठका मुंबई, भोपाळ, अहमदाबाद तसेच जयपूर येथे झालेल्या आहेत.