शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात न्यायदंडाधिकारी संशयाच्या घे-यात, एसीबीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 21:53 IST

म्हापसा न्यायालयात उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुदिन सांगोडकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतल्यामुळे या प्रकरणातील संशयाची सुई चक्क त्या न्यायालयाच्या न्यायाधिशावरच रोखली गेली आहे.

 पणजी - म्हापसा न्यायालयात उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुदिन सांगोडकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतल्यामुळे या प्रकरणातील संशयाची सुई चक्क त्या न्यायालयाच्या न्यायाधिशावरच रोखली गेली आहे. सांगोडकर यांना समन्स बजावून एसीबीकडून त्यांची ३ तास चौकशी करण्यात आली.

एसीबीने पकडलेली २०० रुपये ही लाचेची रक्कम थट्टेचा विषय वाटत असला तरी या प्रकरणाने प्रत्यक्ष न्यायसंस्थेच्या विश्वासहार्तेवरच बोट दाखविण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश संशयाच्या घेºयात आले आहेत. त्यांना एसीबीकडून समन्स बजावून त्यांची ३ तास चौकशी केलीच, शिवाय त्यांच्या घरावर छापा टाकून झडतीही घेतली आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे आणि बँक संबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. वाहतूक नियम भंगासाठी कमी रकमेची पावती फाडून अधिक रक्कम उकळणाºया शिपायाला शुक्रवारी  म्हापसा न्यायालयाच्या डी न्यायालयात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले होते. तीळू आरोसकर असे नाव असलेला हा शिपायी केवळ मध्यस्थ म्हणून ही लाचखोरी करत होता असे तपासातून आढळून आले होते. हे पैसे कुणाला जात होते याची माहितीही पोलिसांना तपासातून मिळाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रंगेहाथ पकडल्यानंतर तिळूने ही माहिती एसीबीला दिली होती. परंतु याबाबत एसीबीकडून गुप्तता पाळण्यात येत होती. परंतु प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सांगोडकर यांना समन्स पाठविण्यात आल्यावर आणि त्याची एसीबीत चौकशी सुरू असतानाच त्याच्या निवासस्थानी झडती सुरू झाल्यावर या प्रकरणात धक्कादायक वस्तुस्थिती बाहेर पडण्याची श्क्यता निर्माण झाली आहे.  सांगोडकर यांची चौकशी करून जबानी नोंदवून घेण्यात आल्याची  माहिती एसीबीकडून देण्यात आली. गुरूवारी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, परंतु अटक करण्यात आली नव्हती. खाजगी वाहने पर्यटकांना भाड्याने देण्याच्या प्रकरणात ज्यांना पकडण्यात आले होते त्यांच्याकडून दंडाची रक्कम म्हणून साडेचार हजार रुपयापर्यंत घेतली जात होती आणि केवळ २००रुपयांची पावती फाडली जात होती. या प्रकरणात कुणी तरी एसीबीला माहिती दिल्यानंतर एसीबीच्या एसीबीने नियोजनबद्द सापळा रचून तिळू याला रंगेहाथ पकडले होते.

टॅग्स :Crimeगुन्हाgoaगोवा