शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

उशीने दाबले नाक; दोरीने आवळला गळा

By admin | Updated: February 5, 2015 01:38 IST

पणजी : मांगोर हिल-वास्को येथील दुहेरी खून प्रकरणाचे अनेक धक्कादायक कंगोरे आता पुढे येत आहेत.

पणजी : मांगोर हिल-वास्को येथील दुहेरी खून प्रकरणाचे अनेक धक्कादायक कंगोरे आता पुढे येत आहेत. सुडाच्या भावनेने पेटून उठलेल्या प्रतिमा नाईकने सासू उषाला दोरीने गळा आवळून, तर जाऊ नेहाला नाकावर उशी दाबून धरून ठार केले. तशी कबुली प्रतिमाने पोलिसांसमोर दिली. अत्यंत नियोजनबद्धरीत्या व थंड डोक्याने तिने हे खून तर केलेच; शिवाय पुरावे नष्ट करून स्वत: नामानिराळी भासविण्याचे कारस्थानही व्यवस्थितपणे रचले. या प्रकरणी तिच्या बहिणीचा नवरा अभिजित कोरगावकर याचाही सहभाग असल्याचे आढळल्याने त्यालाही सहआरोपी करून अटक केली आहे. सासू आपल्याला अत्यंत हीन वागणूक, तर जाऊ नेहाला चांगली वागणूक देते. आपल्या स्वैर वागण्यालाही सासूचा वारंवार आक्षेप असतो. माझे सर्व स्वातंत्र्यच हिरावून घेतले होते. म्हणून आपण दोघींचाही खून केल्याची कबुली प्रतिमाने पोलिसांना दिली आहे. पोलिसांच्या निष्कर्षानुसार खुनाची अनेक कारणे आहेत. त्यात पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केलेले कारण हे संशयिताच्या कबुलीनुसार, आपल्यावर निर्बंध घालणाऱ्या सासू आणि जावेवर सूड उगविणे हे आहे; परंतु प्रतिमाचे रंगेल चारित्र्यच तिच्यावरील निर्बंधांसाठी कारणीभूत ठरले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तिच्या प्रियकराबाबत माहिती मिळाली. याच प्रियकराच्या मदतीने ती घरातून चोरीही करत होती. तिच्या गुन्ह्यांची सुरुवातच अनैतिक संबंधांतून सुरू झाली होती, अशी माहिती एका तपास अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)