शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान सरकारने राज्यातील जनतेची अवस्था जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी केली; काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2024 07:51 IST

राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पाहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सामान्य लोकांची जी स्थिती आहे ती जाळ्यात अडकलेल्या किड्याप्रमाणे आहे. विद्यमान सरकारनेच ही अवस्था करून ठेवली आहे. आमच्या जमीनी आज परप्रांतियांच्या घशात घातल्या जात आहेत. आपण पोर्तुगीजांना दोष देत असलो, तरी राज्याच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कायदे महत्त्वपूर्ण आहेत, असे उद्‌गार माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी काढले.

सध्याच्या काळात राज्यातील जमिनी वाचवण्याची आणि चक्रव्यूहात अडकलेला गोवा त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधकांची आहे, खलप म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.

राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत. सीआरझेड नावाची गोष्टच आता राहिलेली दिसत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी सर्वांनीच एकत्रित काम करणे आवश्यक आहे. आज राज्य उद्ध्वस्त होत असताना 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असे पुन्हा पुन्हा विचारले जाणे आवश्यक असल्याचे खलप यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी राज्याच्या राजकारणाचा डोळस इतिहास लिहण्यास सुरुवात केली पाहिजे. गोवा सहकार मित्र मंडळाकडून सहकार क्षेत्रात जे आज चालले आहे त्याची चिकित्सा, चिरफाड करावी, असे आवाहनही अॅड. खलप यांनी केले. राज्यात मोठ्या प्रमाणात जमिनी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने अनेक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे लोकांनी योग्य पडताळणी करण्याची गरज असल्याचे अॅड. खलप म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस