शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विरोधीपक्षनेत्याच्या घरून चालतो मटका जुगार, क्राईमब्रँचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 20:39 IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा नोंदविलेले कॉंग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी गुन्हा अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात  मोठ्या प्रमाणावर मटक्याच्या स्लीप्स सापडल्या.

पणजी, दि. 20 : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा नोंदविलेले कॉंग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी गुन्हा अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात  मोठ्या प्रमाणावर मटक्याच्या स्लीप्स सापडल्या. त्या ठिकाणावरून मटका जुगाराची सूत्रे हलविली जात असल्याचा एसीबीच्या तपासाचा निष्कर्श आहे. 

कवळेकर यांच्या निवासस्थानी क्राईम ब्रँचच्या पथकाला मोठ्या प्रमाणावर मटका जुगाराच्या स्लीपी सापडल्या. मटका एजंटना पुरविल्या जाणाºया त्या स्लीपी असल्यामुळे तेथूनच या स्लीपी मटका एजंटना पुरविल्या जात असल्याच्या निष्कर्शावर पोलीस पोहोचले आहेत. केवळ मटका स्लीपीच नव्हे तर त्या ठिकाणाहून बराच कर्मचारी वर्ग काम करीत असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. विशेषत: काणकोण व केपे तालक्यात होणारा मटका व्यवहार तेथूनच हाताळला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

क्राईम ब्रँचचे निरीक्षक विश्वेश कर्पेयांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यात पोसिांनी बरेच पुरावे मिळविले आहेत. मटका स्लीप आणि इतर साहित्या जप्त करण्यात आले असल्याची माहिती क्राईम ब्रॅ्रंचचे अधीक्षक कार्तिक कश्यपयांनी दिली. 

एसीबीमुळे कळलेभ्रष्टाचार विरोधी विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर शनिवारी कवळेकर यांच्या निवास्थानी छापा टाकला होता. त्यावेळी एसीबीला जे काही सापडले त्यात मटका बुकीची स्लीप्सही आढळल्या होत्या. एसीबीने याची माहिती क्राईम ब्रँचला दिल्यामुळे क्राईम ब्रँचने बुधवारी धडक कारवाई करून या स्लीपी जप्त केल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानंतर मटका प्रकरणात क्राईम ब्रँचला तपास करण्याची सूचना करण्यात आली होती. या प्रकरणात क्राईम ब्रँचचा तपास सुरू आहे. 

चौकशीला बोलावणारया घटनेनंतर बाबू कवळेकर यांच्या विरोधात मटका प्रकरणात वेगळा गुन्हा नोंदविला जाणार नाही, परंतु या अगोदरच नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुशंगाने त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचचे अधिक्षक कार्तीक कश्यप यांनी दिली. या दोन दिवसात त्यांना समन्स बजावून चौकशीला बोलावण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा