शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जमीन बळकावल्याप्रकरणी आमदाराच्या पत्नीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 17:33 IST

पाटबंधारे खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण : आमदार म्हणतात, राजकीय कुभांड

मडगाव: सरकारी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपाखाली कुंकळ्ळीचे आमदार  क्लाफासियो डायस यांच्या पत्नी सीमा डायस यांच्या विरोधात केपे पोलीस स्थानकात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंद केला आहे. पाटबंधारे खात्याच्या मालकीची जमीन बळकावून त्यावर डायस यांनी स्टोन क्रशर यंत्रणा उभारल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीमा डायस या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष होत्या.

पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंते मोहन हलकट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केल्याचे केपे पोलिसांनी सांगितले. डायस यांच्या विरोधात भादंसंच्या 403 (जमीन गैरव्यवहार) आणि 447 (सरकारी जागेवर अतिक्रमण करणो) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. 

दरम्यान, यासंदर्भात बोलताना आमदार डायस यांनी, सदर जमिनीचा मालक कोण याबद्दलचा दावा उच्च न्यायालयात चालू आहे. सदर जमीन सरकारी मालकीची नाही असे सांगितले. केवळ राजकीय हेतूने आपल्या पत्नी विरोधात हा गुन्हा दाखल केल्याचे ते म्हणाले.या प्रकरणाची माहिती अशी की, केपेजवळ असलेल्या मुळे-पारोडा येथील सव्र्हे क्र. 155/1 मधील सुमारे 8675 चौ.मी. जागेवर सीमा डायस यांच्या मालकीचा क्रशर आहे. ज्या जागेवर हा क्रशर आहे जागा 1984 मध्ये पाटबंधारे खात्याने साळावली सिंचन प्रकल्पाच्या विस्तारासाठी संपादीत केली होती. सदर स्टोन क्रशर पाटबंधारे खात्याच्या कालव्याच्या अगदी जवळ असून हा क्रशर बेकायदेशीर असल्याची तक्रार यापूर्वी पारोडय़ाचे माजी सरपंच गाब्रिएल फर्नाडिस यांनी केली होती.

या तक्रारीनंतर पाटबंधारे खात्याने या क्रशरची पहाणी केली होती. त्या पहाणीनंतर खात्याचे अभियंते हलकट्टी यांनी गुरुवारी केपे पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती. 

टॅग्स :goaगोवाMLAआमदार