शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

गोवा बनतोय मानवी तस्करीचे प्रमुख केंद्र, गेल्या पाच वर्षात अत्याचारात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 20:32 IST

गोवा महिला व मुलीसाठी सुरक्षित राज्य असे सांगितले जात असले तरी या लहान राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचारही मोठय़ा प्रमाणावर असून मागच्या पाच वर्षात 1864 महिलांवर तर 1194 मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना पोलीस दफ्तरी नोंद झाल्या आहेत.

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: गोवा महिला व मुलीसाठी सुरक्षित राज्य असे सांगितले जात असले तरी या लहान राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचारही मोठय़ा प्रमाणावर असून मागच्या पाच वर्षात 1864 महिलांवर तर 1194 मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना पोलीस दफ्तरी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे ड्रग व्यवसायापाठोपाठ  गोव्यात महिलांची तस्करी हाही एक चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी गोव्यात अशाप्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांची नोंद झाली असून पहिल्या घटनेत मडगावात एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांकडूनच बलात्कार होऊन ती गरोदर रहाण्याचा प्रकार उघडकीस आला असून दुस-या घटनेत अंजुणा पोलिसांनी वेश्या व्यवसायात सामील असलेल्या तिघांना अटक करताना दोन युवतींची सुटका केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये राजस्थानच्या एका पुरुष व्यक्तीबरोबर सांगलीच्या दोन महिलांचाही समावेश आहे.वेश्या व्यवसायातील महिलांना त्या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेल्या अन्याय रहित जिंदगी (अर्ज) या संघटनेचे प्रमुख अरुण पांडे यांच्यामते, गोवा हे मानव तस्करीचे प्रमुख केंद्र बनले असून कित्येक महिला व मुलींना नोकरीचे आमिष देऊन गोव्यात आणले जाते आणि नंतर त्यांना वेश्या व्यवसायाला जुंपले जाते. फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी युवतींनाही अशाचप्रकारे फसवून गोव्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते.पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, वेश्या व्यवसायात आणलेल्या मुली बहुतेकवेळा नैऋत्य भारत, बंगाल, आंध्र व कर्नाटकातून आणल्या जातात. त्याशिवाय उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्केमिनिस्तान तसेच बांगला देशमधून या मुली आणल्या जातात. वास्तविक नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांना भारतात आणले जाते. मात्र भारतात आल्यावर या मुलींचे पासपोर्ट त्यांचे एजंट काढून घेतात आणि जर या मुलींनी वेश्या व्यवसायात जाण्यास नकार दिला तर भारतात बेकायदेशीर वास्तव केल्याच्या आरोपाखाली त्यांना पोलिसांकडे देण्याची धमकी दिली जाते.पांडे यांच्या मताप्रमाणे, गोव्यात वास्तविक अशा घटना मोठय़ा प्रमाणावर घडत असतात. पण त्यातील काहीच प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. वास्तविक अशाप्रकारच्या मानवी तस्करीत असलेल्या संशयितांवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा असताना वेळकाढू न्याय प्रक्रियेमुळे त्या बाधित मुलींना योग्य न्याय मिळतच नाही. आजर्पयत अशाप्रकारच्या गुन्हय़ात संशयितांवर कडक कारवाई न झाल्यामुळे हे गुन्हे करण्यास हे संशयित भितही नाहीत असे ते म्हणाले.अशा प्रकरणात बाधित तरुणींना योग्य न्याय मिळावा आणि ही प्रकरणो त्वरित हातावेगळी व्हावीत यासाठी गोव्यात दोन्ही जिल्हय़ांत खास न्यायालये स्थापन करावीत अशी मागणी अर्ज या संघटनेने केली आहे. येत्या आठवडय़ात या संदर्भात आम्ही गृहसचिवांची भेट घेऊ असे त्यांनी सांगितले.दरम्यान, गोव्यात अल्पवयीन मुलींवर होणा-या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातही बरीच वाढ झालेली असून नात्यातील व्यक्तींकडूनच अल्पवयीन मुलींवर बलात्कारासारखे अत्याचार होण्याचे प्रकार वाढले आहेत अशी खंत बायलांचो एकवोट या संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी व्यक्त केली. अशा प्रकरणावर अंकुश आणण्यासाठी गोव्यात एक खिडकी सहाय्यता केंद्र उघडण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा