शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण, एकूण संख्या 47 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 11:07 IST

गोव्यात रेल्वेद्वारे प्रवासी येण्यास आरंभ होताच नवे कोरोना रुग्ण आढळले. दिल्ली व मुंबईहून आलेल्या रेल्वेद्वारे गोव्यात आतार्पयत एकूण तीस कोरोना रुग्ण आढळले. उर्वरित रुग्ण रस्तामार्गे आले.

पणजी - गोवा ग्रीन झोन आहे असे यापूर्वी जाहीर करून गोव्याने त्याविषयी आनंदोत्सवच साजरा केला तरी, गोव्यात गेल्या दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी दोन नवे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर शुक्रवारी पुन्हा आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले. हे दोघेही रस्तामार्गे मुंबईहून गोव्यात दाखल झाले होते. त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. दोघेही चाचणीवेळी कोरोना पॉङिाटीव्ह आढळून आले. गोव्यात दि. 23 एप्रिलर्पयत कोरोना रुग्णांची संख्या फक्त सात होती. ते सातहीजण सरकारच्या कोविड  इस्पितळातील उपचारानंतर ठीक होऊन घरी गेले. चाळीस दिवस गोव्यात एकही नवा कोरोना रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे स्थिती चांगली होती. गोवा हे सुरक्षित राज्य आहे व येथे पर्यटन व्यवसाय देखील येत्या दोन महिन्यांत सुरू करता येईल अशी भाषा काही मंत्री व आमदारांनी चालवली होती. तथापि, एकेचाळीसाव्या दिवसापासून गोव्यात नवे कोरोना रुग्ण सापडण्यास आरंभ झाला. सध्याचा आठवडा सुरू झाल्यानंतर लगेच नऊ कोरोना रूग्ण गोव्यात सापडले होते. गोव्यात रेल्वेद्वारे प्रवासी येण्यास आरंभ होताच नवे कोरोना रुग्ण आढळले. दिल्ली व मुंबईहून आलेल्या रेल्वेद्वारे गोव्यात आतार्पयत एकूण तीस कोरोना रुग्ण आढळले. उर्वरित रुग्ण रस्तामार्गे आले.मुंबईहून येणारे प्रवासी गोव्यासाठी धोकादायक ठरू लागल्याची जनभावना गोव्यात निर्माण झाली आहे. गोवा सरकारलाही तसेच वाटू लागले आहे. सांगली, मुंबई किंवा दिल्लीहून जे प्रवासी गोव्यात येतात, त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा जास्त लक्ष ठेवते. गुरुवारी एक जोडपे मुंबईहून रेल्वेने आले होते. ते कोरोना पॉङिाटीव्ह आढळल्याने त्यास कोविद इस्पितळात दाखल केले गेले. कोविद इस्पितळात पूर्वी फक्त शंभर खाटांची व्यवस्था होती. आता तिथे दोनशे खाटा ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य सचिव निला मोहनन यांच्या मते त्या इस्पितळात आणखी पन्नास खाटा वाढविल्या जातील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा