शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

Coronavirus: गोव्यात तीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार; 20 हजार होम आयसोलेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:55 AM

दहा लाखांमागे 1 लाख 94 हजार एवढे सध्या चाचण्यांचे प्रमाण आहे. देशभरात सगळीकडेच आता कोविड चाचण्या कमी केल्या जातात. ज्यांना कोविडची लक्षणे दिसतात, त्यांचीच कोविड चाचणी केली जाते.

पणजी : राज्यात पुढील वीस ते बावीस दिवसांत एकूण तीन लाख कोविड चाचण्यांचा आकडा पूर्ण होणार आहे. सध्या 2 लाख 83 हजार कोविड चाचण्या झालेल्या आहेत. सध्या रोज जरी कमी चाचण्या होत असल्या तरी, पुढील वीस ते बावीस दिवसांत तीन लाख चाचण्या पूर्ण होणार आहेत व एवढय़ा चाचण्या करणारे गोवा हे छोटय़ा राज्यांमधील एक महत्त्वाचे राज्य ठरणार आहे.

दहा लाखांमागे 1 लाख 94 हजार एवढे सध्या चाचण्यांचे प्रमाण आहे. देशभरात सगळीकडेच आता कोविड चाचण्या कमी केल्या जातात. ज्यांना कोविडची लक्षणे दिसतात, त्यांचीच कोविड चाचणी केली जाते. गोव्यात रोज सरासरी बाराशे कोविड चाचण्या केल्या जातात. सोमवारी मात्र चाचण्या कमी केल्या गेल्या. फक्त 742 एवढय़ाच चाचण्या सोमवारच्या चोवीस तासांत पार पडल्या. रविवारी 1 हजार 246 चाचण्या केल्या गेल्या.

साडेपंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात सात ते साडेसात महिन्यांत तीन लाख चाचण्या होणो हे खूप महत्त्वाचे आहे. दि. 17 सप्टेंबर्पयत राज्यात कोविड चाचण्यांचे एकूण प्रमाण 2 लाख 31 हजार 801 होते. दि. 30 सप्टेंबरला हे प्रमाण 2 लाख 54 हजार 801 र्पयत पोहचले. दि. 7 ऑक्टोबरला कोविड चाचण्यांचे एकूण प्रमाण 2 लाख 65 हजार 959 झाले. त्यावेळी दिवसाला सोळाशे ते अठराशे चाचण्या केल्या जात होत्या. दि. 12 ऑक्टोबरला एकूण कोविड चाचण्यांचे प्रमाण 2 लाख 73 हजार 404 र्पयत गेले.  त्या दिवशी चोवीस तासांत 1 हजर 442 चाचण्या झाल्या होत्या. दि. 17 ऑक्टोबरला एकूण चाचण्यांचे प्रमाण 2 लाख 80 हजारच्याही पुढे गेले. त्या दिवशी चोवीस तासांत 1 हजार 408 चाचण्या झाल्या होत्या.

20 हजार होम आयसोलेशन दरम्यान, होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारणाऱ्या कोविडग्रस्तांची संख्या गेल्या महिन्याभरात वाढत गेली. आतार्पयत एकूण 20 हजार 200 हून अधिक रुग्णांनी होम आयसोलेशन स्वीकारले. ज्यांना कोविडपासून त्रस होतो, तेच रुग्ण इस्पितळात जातात. होम आयसोलेशनमध्ये असणा:या रुग्णांना कोविडविषयक उपचारांच्या गोळ्य़ा, ऑक्सीमीटर वगैरे साहित्य असलेले पॅक आता घरी पोहचविले जाते. रोज सरासरी दीडशे कोविडग्रस्त होम आयसोलेशन स्वीकारत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या