शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

CoronaVirus: संभाव्य कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी गोव्यात तीन दिवस सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:36 PM

प्रत्येक घराला भेट देऊन हे सर्वेक्षण करून घेतले जाईल. सुमारे सहा हजार कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करतील.

पणजी : राज्यात कुणाला कोरोनाची लक्षणो दिसून येतात काय, कुणाला ताप आलेला आहे का किंवा कुणी 15 फेब्रुवारीपासून आतार्पयत विदेशात प्रवास करून आलेले आहेत काय हे शोधून काढण्यासाठी सरकार राज्यभर येत्या 11 पासून तीन दिवस मोठे सर्वेक्षण करून घेणार आहे. प्रत्येक घराला भेट देऊन हे सर्वेक्षण करून घेतले जाईल. सुमारे सहा हजार कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करतील.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या 14 पर्यंत आम्हाला सर्वेक्षण पूर्ण करून घ्यायचे आहे. आम्हा 13 पर्यंत लक्ष्य ठेवले आहे. अंगणवाडी कर्मचारी, बीएलओ, शिक्षक, आरोग्य खात्याचे कर्मचारी यांचा वापर करून गोव्यातील प्रत्येक वाडय़ावरील प्रत्येक घरात सर्वेक्षण केले जाईल. एक अर्ज प्रत्येक कुटुंबाने भरून द्यावा लागेल. प्रत्येकी दोन कर्मचारी घरी येतील. लोकांनी खरीखुरी माहिती द्यावी. कारण आम्हाला कोरोनाचा सामाजिक प्रसार होण्यापासून गोव्याला वाचवायचे आहे. घरात किती भाडेकरू राहतात याविषयीही माहिती द्यावी. ही माहिती फक्त आरोग्य खात्याच्याच नोंदीमध्ये राहील, ती अन्य कारणास्तव वापरली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.20 टक्के ज्यादा वेतन कोरोनाच्या कामाशी निगडीत जे कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार, सुरक्षारक्षक वगैरे काम करतात, त्या सर्वांना वीस टक्के ज्यादा वेतन दिले जाईल. जोपर्यंत हे काम सुरू राहील तोपर्यंतच्या सर्व महिन्यांसाठी मूळ वेतनश्रेणीच्या तुलनेत वीस टक्के ज्यादा वेतन त्यांना मिळेल. कंत्राटी कामगारांनाही ही वेतनवाढ लागू होईल. तसेच या सर्व कर्मचा-यांचा सरकार पन्नास लाख रुपयांर्पयत विमा छत्रही सरकार देणार आहे. जे अधिकारी, कर्मचारी कोरोनाशीनिगडीत काम करतात त्यांना रोज हॉटेलमध्ये ठेवले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा इंटरनॅशनल सेंटरचाही वापर सरकार करणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या