शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात कडकडीत लॉकडाऊन, अनेक ठिकाणी शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:00 IST

राज्यभरात लोकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सर्वत्र रस्ते सुनेसुने झाले होते. बाजारपेठा पूर्णत: बंदच राहिल्या.

पणजी - कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन आजपासून सुरु झाला. राज्यभरात लोकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सर्वत्र रस्ते सुनेसुने झाले होते. बाजारपेठा पूर्णत: बंदच राहिल्या. कोविडची सर्वात जास्त लागण झालेल्या वास्को शहरवासीयांनी कडकडीत लॉकडाऊन पाळला.राज्यात सर्वत्र लोकांनी सहकार्य केल्याने यावेळी पोलिसी बळ वापरावे लागले नाही. सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे तरीही  साखळी, डिचोली भागात खनिजवाहू ट्रकांची वाहतूक मात्र बिनदिक्कत सुरु होती यामुळे संताप व्यक्त केला जात होता.जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, दूध विक्री, औषधालयें, वर्तमानपत्रांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. लोकांना दुध, पाव वगैरे वस्तू सकाळी उपलब्ध झाल्या. औद्योगिक वसाहतींमधील कारखानेही वगळण्यात आले होते. लॉकडाऊन उल्लंघनांबाबत तशी फारशी मोठी प्रकरणे घडलेली नाहीत. काही किरकोळ घटना घडल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी सांगितले. कदंब महामंडळानेही बसगाड्या बंद ठेवल्या. एरव्ही कदंबच्या ५२४ पैकी १७८ बसगाड्या वाहतूक करीत असत. खाजगी बसेसही पूर्णपणे बंद होत्या. एरव्ही केवळ दहा टक्के खाजगी बसेस वाहतूक करीत असत.लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे तरीही  साखळी, डिचोली भागात खनिजवाहू ट्रकांची बिनदिक्कत वाहतूक सुरु होती. त्यामुळे हे लॉकडाऊन गरीबांसाठीच आहे का? खाण व्यावसायिकांना लागू होत नाही का? असे संतप्त सवाल नागरिकांनी केले. राज्यातील सर्व १८ ही जलमार्गांवरील फेरीबोटीही बंदच राहिल्या. नदी परिवहन खात्याचे अधिक्षक विक्रमसिंह भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसारकेवळ वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगासाठी किंवा गोमेकॉ कर्मचारी, पोलिस यांच्यासाठीच फेरीबोट सेवो दिली जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा