शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : गोव्यात काजू उत्पादकांना मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:51 IST

Coronavirus : गोव्यातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅंड, ऑस्ट्रेलिया व मध्यपूर्व राष्ट्रांना गोव्याचा काजू जातो. गोव्याला भेट देणारे पर्यटक काजू घेतल्याशिवाय जात नाहीत.

- किशोर कुबल

पणजी - साधारणपणे वर्षाकाठी २०० कोटींची काजू निर्यात होत असलेल्या गोव्यात लॉकडाऊनचा काजू  बागायतदारांना फार मोठा फटका बसला आहे. काजू उत्पादक तसेच विरोधी कॉंग्रेस पक्षाने बागायतदारांना काजूसाठी पुरेसा आधारभूत दर द्यावा, अशी आग्रही मागणी सरकारकडे केली आहे.

गोव्यातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅंड, ऑस्ट्रेलिया व मध्यपूर्व राष्ट्रांना गोव्याचा काजू जातो. गोव्याला भेट देणारे पर्यटक काजू घेतल्याशिवाय जात नाहीत. त्यामुळे जशी मद्याची दुकाने गोव्याच्या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये जागोजागी दिसतात तशीच काजू विक्री करणारी दुकाने हजारोंच्या संख्येने आहेत. काही दुकानदार तर काजू अन्य राष्ट्रांमधून आयात करूनही विकतात. अशी एक आकडेवारी मिळते की, इंडोनेशिया, तांझानिया व पूर्व आणि पश्चिम आफ्रिकन राष्ट्रांमधून १० ते १२ हजार टन काजू वर्षाकाठी गोव्यात आयात होतो. काजू विक्रीच्या दुकानांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल राज्यात होत असते. 

'किमान १३० रुपये किलो भाव हवा'

काजू बागायतदारांना सरकारने काजूसाठी किमान १३० रुपये प्रति किलो आधारभूत दर द्यावा, अशी मागणी गाकुवेध महासंघाचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गोवा बागायतदारने  प्रति किलो केवळ १०५ रुपये दर देऊ केला आहे. महासंघाला हा दर मान्य नाही. लॉकडाऊनच्या आधी १३५ रुपये किलो दराने काजू विकला गेला. २०१८-१९ मध्ये देशभरातून तब्बल ४५०० कोटी रुपयांची काजू निर्यात झाली. साधारणपणे २०० कोटींची काजू निर्यात गोव्यातून होते. बाळ्ळी येथील आदर्श कृषी को-ऑपरेटिव्ह सोसायटीने काजू बागायतदारांना १३४ ते १३६ रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. परंतु आता हा दरही दुरापास्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून काजू उत्पादकांना १३० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दर प्रतिकिलोला मिळेल याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुरेसा किमान आधारभूत दर द्या, कॉंग्रेसची मागणी

दरम्यान,  गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतिकिलो १०० रुपयांची  सध्याची किमान आधारभूत किंमत खूपच कमी आहे, असे म्हटले आहे. " शेतकऱ्यांना मदत केली नाही तर शेती व्यवसाय टिकू शकणार नाही. प्रक्रिया केलेली काजू बी (काजूगर) रु.  ८०० / - ते रू. १२०० / - प्रती किलो विकला जातो. मात्र शेतकऱ्यांना प्रतीकिलो फक्त १०० रुपये आधारअभूत किंमत दिली जाते. हे अयोग्य आहे. यासाठी सरकारने  तातडीने त्यात सुधारणा करावी आणि समस्येचे निराकरण करावे." असे चोडणकर म्हणतात. 

"काजू हे नगदी पीक आहे आणि गोव्यात बरीच कुटुंबे केवळ या व्यवसायावर अवलंबून आहेत. नवीन (कच्च्या) काजूंचे दर खूपच खाली आले आहेत म्हणून त्यांना पुरेशी किमान आधारभूत किंमत देऊन त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. " असे चोडणकर यांनी म्हटले आहे. 

५ हजार हेक्टर जमीन काजू पिकासाठी पुनरुज्जीवित करणार 

दरम्यान, राज्यात काजू लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी ५ हजार हेक्टर जमीन पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मोहिमेअंतर्गत कृषी खात्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येईल. 

तसे पाहता अन्य कोणत्याही राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत गोव्यात काजू लागवडीखालील जमीन जास्त आहे. दरवर्षी ५५ हजार हेक्टर जमिनीत काजू पिक घेतले जाते. पोर्तुगीजांनी जमिनीची धूप रोखण्यासाठी काजू लागवड सुरु केली आणि आता हे राज्याचे नगदी पीक ठरले आहे. काजु बागायतीच्या बाबतीतही यांत्रिकीकरणाची कास धरण्यात येत आहे. काजुच्या वेगवेगळ्या जाती राज्यात उपलब्ध आहेत. 

वन विकास महामंडळाकडे ८ हजार ९७१ हेक्टर जमीन काजू लावडीखाली आहे. २0१७-१८ मध्ये राज्यात २८ हजार टन काजू उत्पादन झाले. २0१६-१७ मध्ये ते २४ हजार ३९६ टन तर २0१५-१६ मध्ये १७ हजार ५४९ टन इतके होते. 

महामंडळ स्वत: काजू काढून विकत नाही तर लिलांव केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी २ लाख १ हजार रुपये उत्पन्न या लिलांवातून मिळाले. प्रती हेक्टर सरासरी २,२५२ रुपये मिळाले. 

२0१४-१५ च्या लेखा परीक्षित अहवालानुसार गोवा वन विकास महामंडळाला २0१४-१५ या आर्थिक वर्षात २६ लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे. अनेक काजू बागायतींमध्ये कीड लागण्याच्या घटनांमुळे समस्या निर्माण झालेली आहे. कीड लागण्याच्या या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याने सुमारे १0 टक्के झाडे वर्षाकाठी नष्ट होतात, असे आढळून आले आहे. रासायनिक किटकनाशकें वापरुनच या कीडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा लागतो.

प्राप्त माहितीनुसार कीटकनाशकें खरेदी करण्यासाठी कृषी खाते खर्चाच्या ७५ टक्क्यांपर्यंत अर्थसाहाय्य करते. हेक्टरमागे कमाल ४,५00 रुपये या प्रमाणे कमाल चार हेक्टरपर्यंत १८ हजार रुपये अनुदान दिले जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : वायू दुर्घटनेतून बचावले; पण 'त्या' 5 जणांना कोरोनाने गाठले

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी कर्नाटक करतंय 'या' तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य मंत्रालयाने केलं कौतुक

Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात 

Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार

Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgoaगोवा