शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

CoronaVirus : खाकीतील माणुसकी! स्वत:च्या पगारातून ७० कुटुंबीयांना रेशन पुरविणारे पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 22:06 IST

CoronaVirus : गोवा क्राइम ब्रँचच्या सहा पोलिसांनी स्वतःच्या पगारातून टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट यांच्यासह एकूण ७० कुटुंबांसाठी रेशन खरेदी केले.

पणजीः देशात आणि राज्यात कोणतीही आणीबाणीची परिस्थिती असो किंवा कोणताही प्रसंग. समोर ठामपणे उभे असतात, ते म्हणजे पोलीस. याच पोलिसांनी सध्याच्या परिस्थित खाकीतील माणुसकी दाखविली आहे. गोवा क्राइम ब्रँचच्या सहा पोलिसांनी स्वतःच्या पगारातून टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट यांच्यासह एकूण ७० कुटुंबांसाठी रेशन खरेदी केले.   

क्राइम ब्रँचचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी त्यांच्या इतर पाच सहकाऱ्यांच्या योगदानातून एक निश्चित अशी रक्कम जमविली.  त्यात स्वतः निरीक्षक सावंत,  हेड कन्स्टेबल दिनेश पिकुळकर, कॉन्स्टेल नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर,  किरण परब आणि संजय गांवकर यांनी  आपल्या पगारातून पैसे जमा केले. जमा झालेल्या पैशातून तांदुळ व इतर कडधान्ये खरेदी केली. त्यानंतर 70 पिशव्या तयार केल्या आणि त्यामध्ये प्रत्येकी 10 किलो तांदुळ, 5 किलो पीठ, 1 किलो साखर, 1 किलो तुरडाळ मसाला पिकिटे आणि बिस्किटे असे साहित्य भरले. या भरलेल्या पिशव्या डिचोली, साखळी, वाळपई  या ठिकाणच्या टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट यांच्यासह एकूण ७० कुटुंबीयांना दिल्या. 

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेले लोक म्हणजे टॅक्सी व्यावसायिक असल्यामुळे त्यांना मदतीची सर्वाधिक गरज असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम करावासा वाटला, असे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा