शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

CoronaVirus News: गोव्यात 7 दिवसांत फक्त 15 हजार कोविड चाचण्या; 2144 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 2:52 PM

CoronaVirus News: कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज; पूर्ण क्षमता वापरण्याची मागणी

पणजी : राज्यात गेल्या सहा दिवसांत फक्त 15 हजार 28 व्यक्तींच्या कोविड चाचण्या झाल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या काळात चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. 15 हजार 28 चाचण्या केल्यानंतर एकूण 2 हजार 144 व्यक्ती कोविडग्रस्त असल्याचे आढळून आले.राज्यात दिवसाला अडीच ते तीन हजार कोविड चाचण्या करण्याची क्षमता आहे. मात्र चतुर्थी सणाच्या काळात ही क्षमता पूर्णपणो वापरली गेली नाही असे उपलब्ध आकडेवारीवरून कळून येते. आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधून जी आकडेवारी दिली गेली, त्यानुसार पाहिल्यास गेल्या 22 रोजी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी फक्त 1 हजार 661 व्यक्तीच्या कोविड चाचण्या झाल्याचे स्पष्ट होते. दुस:या दिवशी म्हणजे 23 रोजी तर फक्त 880 कोविड चाचण्या झाल्या आहेत. 24 रोजी देखील तुलनेने कमीच कोविड चाचण्या झाल्या. त्या दिवशी फक्त 1 हजार 693 व्यक्तींच्या कोविड चाचण्या केल्या गेल्या. याउलट चतुर्थीपूर्वीची आकडेवारी जर पाहिली तर जास्त कोविड चाचण्या झाल्याचे दिसून येते. 18 ऑगस्ट रोजी 2 हजार 724 कोविड चाचण्या केल्या गेल्या. 19 रोजी 2 हजार 551 व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठवले गेले. 18 रोजी देखील राज्यात मोठ्या संख्येने कोविड चाचण्या केल्या गेल्या. त्या दिवशी 2 हजार 744 व्यक्तींच्या चाचण्या झाल्या व त्यात 339 व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्या. चतुर्थीच्या दिवशी फक्त 306 कोविडग्रस्त आढळले. कारण त्या दिवशी चाचण्या कमी झाल्या. 23 रोजी फक्त 209 कोविड पॉझिटिव्ह आढळले. त्या दिवशी फक्त 880 कोविड चाचण्या झाल्या. राज्यात चाचण्यांची संख्या अजून वाढवण्याची गरज आहे. चाचण्या वाढल्या तरच कोविडग्रस्त कोण आहेत ते लवकर कळून येईल. गणेशोत्सव काळात बाजारपेठांमध्ये व अन्यत्र सोशल डिस्टन्सिंग पाळले गेलेले नाही.साडेतीन हजार व्यक्ती घरीच दरम्यान, कोविडची लक्षणो जर दिसत नसतील व घरी राहण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था जर असेल तर सरकारी परवानगीनंतर कोविडग्रस्त स्वत:च्या घरीच क्वारंटाईनच्या स्थितीत राहू शकतात. रोज शंभर ते दीडशे व्यक्ती अशा प्रकारे घरीच राहत आहेत. एकूण 3 हजार 516 कोविडग्रस्त सध्या घरीच राहून उपचार घेत आहेत. ज्यांना ताप येतो किंवा थंडी झाली किंवा श्वासोश्वासाचा त्रस होतो त्यांना कोविड इस्पितळात उपचारांसाठी दाखल व्हावे लागते.दिल्लीहून एम्सच्या इस्पितळातील डॉक्टरांचे जे पथक आले आहे, त्या पथकाने दुपारी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाला भेट दिली व कोविडग्रस्तांवर उपचार करण्यासाठी तिथे कोणती व्यवस्था आहे याची पाहणी केली. याचप्रमाणे सायंकाळी हे पथक मडगावच्या ईएसआय इस्पितळालाही भेट देणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या