शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिलासादायक! गोव्यात गेल्या 20 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 21:28 IST

CoronaVirus : राज्यात एक हजारपेक्षा जास्त व्यक्तींच्या आतापर्यंत कोरोना (कोविड-19) चाचण्या केल्या आहेत.

पणजी : राज्यात गेल्या 20 दिवसांत कोरोनाचा एकही नवा कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. याबाबत सरकार समाधानी बनले आहे. तरीही परप्रांतांमधून जे कुणी आडवाटांनी गोव्यात येतात, त्यांना पकडून सक्तीने निगराणीखाली ठेवण्याचे काम सुरू आहे.

राज्यात एक हजारपेक्षा जास्त व्यक्तींच्या आतापर्यंत कोरोना (कोविड-19) चाचण्या केल्या आहेत. गेल्या 3 एप्रिल रोजी शेवटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्याच्यावरही कोविड इस्पितळात यशस्वी उपचार केले गेले. तो रुग्ण ठीक झाला. आता राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही. शेवटचा रुग्ण सापडल्यानंतर चौदा दिवसांत जर नवा कोरोना रुग्ण सापडला नाही तर अशा कोणत्याही राज्याला अतिशय सुरक्षित मानले जाते. गोव्यात तर गेले वीस दिवस कोरोनाचा नवा पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने शासकीय यंत्रणांवरील ताण कमी झाला आहे.

आरोग्य खात्याच्या यंत्रणेकडून राज्यातील पाच हजार व्यक्तींची आता कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. याशिवाय पंचवीस हजार व्यक्तींना श्वासोश्वासाचा त्रास आहे. त्यांच्यापैकी किती जणांना विदेश किंवा देशांतर्गत प्रवासाचा इतिहास आहे, ते पाहून त्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.

1700 उद्योग सुरू राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक कामगार वापरून उद्योग सुरू करावेत असे सरकारने स्पष्ट केल्यानंतर 1 हजार 400 उद्योग प्रथम सुरू झाले. त्यानंतर आज शुक्रवारपासून आणखी तीनशे उद्योग सुरू केले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतींमधील व्यवस्थापकाकडून परवानगी घेऊन हे उद्योग सुरू केले जातात. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योग सुरू आहेत. आरोग्य खात्याकडून सर्व उद्योगांतील कामगारांची यापुढे कोरोना चाचणी करण्याचा प्रस्ताव पुढे आणला गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा