शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Goa : मुंबईतील ‘कोरोना’ हॉटस्पॉटमधून येणाऱ्या प्रवाशांकडून धोका; गोवेकरांमध्ये धास्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 12:46 IST

CoronaVirus News in Marathi and Live updates : केवळ मुंबईतच आजच्या घडीला तब्बल २६४३ ‘कोरोना’ हॉटस्पॉट आहेत. फोर्ट, अंधेरी, विलेपार्ले, सहार गांव, सांताक्रुझ, गिरगाव, माहीम भागात अनेक मूळ गोमंतकीय आहेत.

पणजी : मुंबई, दिल्लीतील ‘कोरोना’ हॉटस्पॉटमधून गोव्यात येणा-या प्रवाशांकडून गोव्यात ‘कोरोना’ फैलावाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोव्यात आल्यानंतर संबंधित प्रवासी मुंबई किंवा दिल्लीच्या कोणत्या भागातून आला, याची माहिती घेतली जाते. परंतु तोपर्यंत कोण प्रवासी कुठून येणार आहे, याची कोणतीही कल्पना प्रशासनाला नसते, असे दिसून आले आहे. दुसरीकडे आतापर्यंत गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण हे अधिकतर महाराष्ट्रातूनच आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून येणा-या प्रवाशांच्या बाबतीत शिष्टचार प्रक्रिया (एसओपी) अधिक कडक करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. 

केवळ मुंबईतच आजच्या घडीला तब्बल २६४३ ‘कोरोना’ हॉटस्पॉट आहेत. फोर्ट, अंधेरी, विलेपार्ले, सहार गांव, सांताक्रुझ, गिरगाव, माहीम भागात अनेक मूळ गोमंतकीय आहेत. मुंबईतील या भागांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हे भाग ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. फोर्ट भागात सुखवस्तू गोवेकर कुटुंबे राहतात जी बड्या कंपन्या किंवा सरकारी खात्यांमध्ये मोठ्या हुद्यांवर अनेक वर्षे काम करतात. सहार गांवमध्ये तर संपूर्ण वसाहतच गोवेकर ख्रिस्तींची आहे. सांताक्रुझ, माहीममध्येही गोवेकरांचे प्रमाण लक्षणीय आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही अधिकतम कोरोना पॉझिटिव्ह हे महाराष्ट्रातून येणारे प्रवासीच असल्याचे मान्य केले आहे. आणि त्या अनुषंगाने शिष्टाचार प्रक्रियेतही काही कडक तरतुदी कराव्या लागणार असल्याचे म्हटले आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे बोलणी चालू आहेत. मान्यता मिळाल्यावर हे पाऊल उचलले जाईल, असे त्यांनी सांगितले. 

दिल्लीतही ८७ ‘कोरोना’ हॉटस्पॉट आहेत. अनेक गोवेकर दिल्लीतही राहतात. संगम विहार, निझामुद्दिन (पश्चिम), व्दारका, कैलाश हिल्स, मोतिबाग, अशोकनगर, शास्री पार्क हे विभाग दिल्लीत ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर झालेले आहेत.  विमान, रेलगाड्या आणि रस्तामार्गे हजारो प्रवाशी पुढील काही दिवसात राज्यात दाखल होणार आहेत. आरोग्य खात्यातील साथरोग विभागाचे प्रमुख तथा ‘कोरोना’चा विषय हाताळणारे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘विमान, रेल्वे अथवा रस्तामार्गे आलेल्या प्रत्येकाची गोव्यात पोहोचल्यानंतर तो कुठल्या भागातून आलेला आहे याची माहिती घेतली जाते. तो जेथून आला तो पत्ता नोंद करुन घेतला जातो. प्रवाशांना आम्ही तीन पर्याय दिले आहेत. 

‘कोविड १९’ची निगेटिव्ह चाचणी आलेला दाखला घेऊन येणा-यांना राज्यात थेट प्रवेश दिला जाईल. त्यांना चाचणी करुन घ्यावी लागणार नाही. मात्र हा दाखला ४८ तास आधी आयसीएमआर अधिमान्यताप्राप्त प्रयोगशाळेने दिलेला असायला हवा अशी अट आहे. इतरांनी २000 रुपये भरुन कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी लागेल. घशातील द्राव चाचणीसाठी काढल्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेऊन घरी पाठवले जाईल. परंतु अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाइन रहावे लागेल आणि ज्यांना २000 रुपये भरुन चाचणी करावयाची नाही त्यांना हातावर शिक्का घेऊन १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. मुंबई, दिल्ली किंवा देशातील अन्य कुठल्याही भागातील हॉटस्पॉटमधून जरी एखादा प्रवासी आला तरी त्याला वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावेच लागेल त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा