शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

CoronaVirus News : ठराविक कोरोनाग्रस्तांना घरी राहण्याची मुभा - प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 15:14 IST

कोरोनाग्रस्तांची जर इच्छा असेल तर लक्षणे नसलेले कोरोनाग्रस्त घरीच राहू शकतात. मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल.

पणजी : कोरोनाची कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत, अशा कोरोनाग्रस्तांना स्वतःच्या घरी क्वारंटाईन  राहण्याची मुभा सरकार देणार आहे. पूर्ण देशात अशा पद्धतीची नवी प्रक्रिया सध्या स्वीकारली जात आहे व गोव्यातही तीच प्रक्रिया रुग्णांच्या इच्छेनुसार लागू केली जाईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

कोरोनाग्रस्तांची जर इच्छा असेल तर लक्षणे नसलेले कोरोनाग्रस्त घरीच राहू शकतात. मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल. अर्जदाराच्या घरी स्वतंत्र बेडरूम, स्वतंत्र शौचालय व अन्य सुविधा आहेत की नाही हे उपजिल्हाधिकारी पाहतील व मान्यता देतील असे मुख्यमंत्री म्हणाले. जर एखाद्या कुटुंबातील सगळे म्हणजे चार किंवा पाचही भाऊ कोरोनाग्रस्त आढळले व त्यांच्याकडून काही लक्षणे दाखवली जात नसतील तर त्यांनी घरीच निगराणीखाली राहणे योग्य ठरेल. शेवटी रुग्णाच्या इच्छेनुसार सरकार परवानगी देईल. अशावेळी शेजारी लोकांनीही कोरोनाग्रस्तांना सहकार्य करायला हवे, त्यांना वेगळ्या नजरेने पाहू नये असे मुख्यमंत्री म्हणाले. 

गोव्यात बाहेरून जे प्रवासी येतात, त्यांची अॅन्टीजंट चाचणी केली जाईल. उद्या गुरूवार पासून ही प्रक्रिया सुरु होईल. तसेच, मांगोरहीलच्या भागात आजपासून अॅन्टिबॉडी चाचणी केली जाईल. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी तशी मागणी केली होती. अॅन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत की नाही हे छोटा मांगोरहीलमध्ये अगोदर कळून येईल. हे लोक मग प्लाझ्मा देण्यासाठीही तयार होतील अशी ग्वाही आमदार आल्मेदा यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

क्लाफास आयसीयूतून बाहेर दरम्यान कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस हे कोविडमधून सावरले आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले गेले. तिथे ते ठिक झाले व त्यामुळे आता त्यांना आयसीयूमध्ये ठेवले गेले आहे. थकवा आलेला असल्याने त्यांना काळजी घ्यावी लागते. कृत्रिम  ऑक्सिजन वापरावा लागतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात आतापर्यंत ज्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतेकजण हृदयरोगी होते किंवा डायबेटीस, मूत्रपिंड विकार असे अनेक आजार त्यांना होते. अशा व्यक्तींना कोरोना होऊ नये म्हणून अधिक काळजी घ्यावीच लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी बातम्या...

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक, ट्रॅकवर उतरून गोंधळ

चीनविरोधात जागतिक आघाडी, अमेरिकेने घेतली अशी भूमिका    

"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज    

"बंदीचे कठोर पालन करा, अन्यथा....", मोदी सरकारचा चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना इशारा

Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत