शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: प्रवासीच नसल्याने मडगाव मंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:19 IST

प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली; थर्मल गनने स्क्रिनिंग  सुरू

मडगाव:  कोरोनाच्या भीतीचा परिणाम आता सार्वजनिक वाहतुकीवरही दिसत असून प्रवासीच नसल्याने कोकण रेल्वेने मडगाव मंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी 31 मार्चपर्यंत रद्द केली आहे. दक्षिण रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने म्हटले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर आरक्षणेही रद्द होऊ लागली असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांना विचारले असता प्रवाशांची संख्याच कमी झाल्याने ही गाडी रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 19 मार्चपासून ही गाडी रद्द करण्यात आली आहे. इतर गाड्यांमधील प्रवासीदेखील कमी येऊ लागले असून कोकण रेल्वेच्या महसुलावरही त्याचा परिणाम झाला आहे.घाटगे यांना विचारले असता  ते म्हणाले,  आरक्षण निम्म्याने रद्द झाले आहे. मडगावचे कोकण रेल्वेचे जंक्शन हे देशातील काही मुख्य जंक्शनपैकी एक असून दररोज सरासरी दहा हजार प्रवासी उतरायचे. मात्र आता हेही प्रमाण निम्म्यावर आले असून स्थिती सुधारली नाही तर ही संख्या अधिकच कमी होईल.दरम्यान कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर प्रवाशांची थर्मल गनने तपासणी सुरू झाली असून मुख्य गेटवरुन आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जाते. सध्या दोनच गन्स उपलब्ध असल्याने एकाच बाजूने स्क्रीनिंग चालू केले असून आणखी गन्स उपलब्ध झाल्यानंतर स्थांनकाच्या मागच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी गन्ससाठी ऑर्डर दिली असल्याचे त्यांनी सांगितले.खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर कोकण रेल्वेचे कम्युनिटी केंद्र आहे, त्याठिकाणी आयसोलेशन सेंटर उघडण्यात आले असून त्या ठिकाणी दहा खाटांची तजवीज करण्यात आली असून जर कुणी संशयीत सापडला तर त्याला प्रथम या केंद्रात ठेऊन नंतर गोमेकोत हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले. मडगाव रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम आणि प्लॅटफॉर्मवर बसण्याच्या जागाही वारंवार निर्जंतुक करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे