शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ‘कदंब’कडून बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:07 IST

आंतरराज्य मार्गांवरील ४०६ बसगाड्यांमध्ये रोज सॅनिटायझर फवारणी 

पणजी : कदंब महामंडळाने ‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्सद्वारे बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण सुरु केले आहे. राज्यांतर्गत धावणाऱ्या बसगाड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, बंगळुरु, मुंबई आदी आंतरराज्य मार्गांवरील बसगाड्यांमध्येही सॅनिटायझर फवारणी केली जात आहे.कदंब महामंडळाचे वाहतूक विभाग सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराज्य मार्गावर धावणाऱ्या कदंबच्या ९४, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या ६७ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ४५ तसेच सुमारे २00 खाजगी आंतरराज्य बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण बुधवारी करण्यात आले. याशिवाय राज्यांतर्गत विविध मार्गांवर धावणाऱ्या कदंबच्या बसेसमध्येही सॅनिटायझर फवारणी केली जाते. रोज सुमारे २0 लिटर सॅनिटायझर दहापट पाणी मिसळून फवारणी केली जाते. घाटे यांनी असेही सांगितले की, कदंब बस स्थानकेही धुवून स्वच्छ केली जातात. मंगळवारी वास्को, वाळपई, होंडा, सांखळी येथील बसस्थानके माजी कर्मचारी तसेच चालक, वाहकांनी स्वच्छ केली. काल बुधवारी डिचोली स्थानक स्वच्छ करण्यात आले. राज्यात १६ बसस्थानके आहेत तेथे रोज साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण केले जाते, असा दावा त्यांनी केला. कदंब महामंडळाच्या कार्यालयात सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. तेथे हात स्वच्छ करुनच कार्यालयात प्रवेश करावा लागतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या