शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : गोव्यात कोरोनाने घेतले तब्बल ७१ बळी, विषाणूच्या भयानक फैलावामुळे राज्य सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 19:23 IST

Coronavirus In Goa : कुणाच्याही जीवाचा थरकाप उडावा अशी स्थिती गोव्यात आहे. लोक घराबाहेर पडण्यास आता घाबरतात. सरकारी कार्यालये ओस पडली आहेत.

पणजी : राज्यात आणखी ७१ कोविड रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे एका गोमेको इस्पितळात ४५ रुग्णांचा जीव गेला. ७१ पैकी ७० रुग्णांचा मृत्यू हा गेल्या चोवीस तासांत झाला. नवे ३ हजार ४९६ कोविड रुग्ण राज्यात आढळले आहेत. पूर्ण राज्य यामुळे सून्न झाले आहे. बुधवारी दर एका तासाला तिघांचे मृत्यू झाले असा अर्थ होत आहे.कुणाच्याही जीवाचा थरकाप उडावा अशी स्थिती राज्यात आहे. लोक घराबाहेर पडण्यास आता घाबरतात. सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. दक्षिण गोव्याच्या जिल्हा इस्पितळात बुधवारी वीस कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. कुडचडे येथील सरकारी रुग्णालयात एकाचा जीव गेला तर दोघांचा मृत्यू उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात झाला. होस्पीसियोमध्ये एकाने अखेरचा श्वास घेतला. ७१ पैकी एक मृत्यू गोमेकोमध्ये २८ रोजी झाला, त्याची नोंद बुधवारी झाली.कमी वयाच्या रुग्णांचा बळी ज्यांनी वयाची चाळीशी गाठली नाही, अशा रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. ज्यांनी पन्नाशी गाठली नाही असे रुग्णही दगावत आहेत. कळंगुट येथील २८ वर्षीय महिलेचे कोविडने निधन झाले. शिवोली येथील ४५ वर्षीय महिला, डिचोलीतील ३९ वर्षीय पुरुष रुग्ण, मडगाव येथील ३५ वर्षीय तरुण यांचे कोविडने निधन झाले. तिसवाडी, सत्तरी, बेती, पेडणे, वास्को, पर्वरी, कुडचडे, खोर्ली, दाबोळी, फातोर्डा, शिरोडा, ताळगाव, केळशी, बायणा , धर्मापुर, सावर्डे अशा गावांतील अनेक कोविडग्रस्तांचा बळी गेला आहे. फातोर्डा येथील दोघांचा मृत्यू झाला.५१.६ टक्के टीपीआर चाचण्यांमागे पोझिटीवीटीचे प्रमाण बुधवारी वाढले. ३९ टक्क्यांवरून हे प्रमाण ५१.६ टक्के झाले आहे. एकूण ६ हजार ७६९ चाचण्या केल्या गेल्या व त्यावेळी ३,४९६ नवे रुग्ण आढळले. राज्यभर आता २७ हजार ९६४ सक्रिय कोविड रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण १,४४३ रुग्णांचे मृत्यू झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाHealthआरोग्य