शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

CoronaVirus : गोव्यातील कोरोना रुग्णालयात अजून 115 खाटा रिकाम्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 13:17 IST

CoronaVirus : मडगावचे इस्पितळ पूर्ण भरलेले आहे हे मंत्री राणे यांचे विधान सरकारमधील अनेक मंत्री व भाजपलाही रुचले नाही.

पणजी : मडगावच्या कोविड इस्पितळातील सर्व खाटा अजून भरलेल्या नाहीत. कोविड इस्पितळातील एकूण 220 खाटांपैकी फक्त 105 खाटांवर रुग्ण आहेत. अजून तिथे 115 खाटा रिकाम्या आहेत, अशी माहिती आरोग्य खात्यानेच बुधवारी दिली. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मडगावच्या कोविड इस्पितळातील सगळ्या खाटा भरलेल्या आहेत, असे विधान मंगळवारी केले होते. पेडणे येथे आरोग्यमंत्री राणे यांनी एक बैठक घेतली होती.उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे या बैठकीस उपस्थित होते. त्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मडगावच्या कोविड इस्पितळातील सगळ्य़ा खाटा भरल्या व आता यापुढे उत्तर गोव्यात एखादे नवे कोविड इस्पितळ सुरू करावे लागेल, असे विधान केले होते. मात्र मंत्री राणे यांना अतिउत्साह नडला. त्यांनी बुधवारीच आपले विधान दुरुस्त केले. त्यांनी नवे विधान केले व कोविड इस्पितळातील 220 पैकी फक्त 105 खाटा व्यापलेल्या आहेत, असे स्पष्ट केले आहे. मडगावचे इस्पितळ पूर्ण भरलेले आहे हे मंत्री राणे यांचे विधान सरकारमधील अनेक मंत्री व भाजपलाही रुचले नाही.दरम्यान, आयसीएमआरने कोविडविरोधात जी नवी काही औषधे स्पष्ट केली आहेत, त्यात फॅबिफ्लू, रेमडिसीवीर व टॉक्सिलीझूमॅब यांचा समावश होतो. ही औषधे खरेदी करण्यासाठी आरोग्य खात्याने प्रक्रिया सुरू केली आहे. रेमडिसीवीर औषधाचा पहिला साठा विमानाने हैदराबादमधून आज बुधवारी सायंकाळपर्यंत गोव्यात दाखल होत आहे, अशी माहितीही मंत्री राणे यांनी दिली. राज्यात सध्या 739 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. रोज सरासरी 90 नवे कोविडग्रस्त आढळतात. चाळीसपेक्षा जास्त गावांमध्ये कोविडग्रस्त व्यक्ती आतापर्यंत आढळल्या आहेत. यामुळे गोव्याला जास्त काळजी घ्यावी लागते. कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या