शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

कोरोना वाढला; डेंग्यू घटला, आतापर्यंत ३७ रुग्ण आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 09:37 IST

आरोग्य यंत्रणा सज्ज, उपाययोजना सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी ( Marathi News ): राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, तर डेंग्यूची प्रकरणे कमी झाली आहेत. राज्यात सध्या ३७ कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या झाली आहे. देशभर सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे.

राज्यात मागील नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूची ७० प्रकरणे नोंदवली, ती आता दि. २३ डिसेंबरपर्यंत एकूण २२ प्रकरणे नोंद झाली आहे. तर दुसन्या बाजूने राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पावसाळा गेल्याने आता डेंग्यूचे रुग्ण कमी झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

राज्यात यंदा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण वाढले होते. काहीजणांचा मृत्यूही झाला होता. पण, आरोग्य यंत्रणेने याची गंभीर दखल घेतली सर्व भागांत जागरूकता केली आहे. त्यामुळे आता हळूहळू डेंग्यूच्या रुग्णांतही घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूची ९० प्रकरणे नोंद झाली होती; तर नोव्हेंबरमध्ये ७० प्रकरणे नोंद झाली. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत २२ प्रकरणे नोंद झाली आहेत.

दाट लोकवस्तीमध्ये जंतूनाशक फवारणी

आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत गोव्यात पडलेल्या अनियमित पावसामुळे रुग्णसंख्या वाढली होती. आता डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत आहेत. म्हापसा, ताळगाव, वास्को, मडगाव, कुठ्ठाळी व चिंबल या भागात परप्रांतीयांची जास्त वस्ती असल्याने तेथे डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. आरोग्य खात्याने डेंग्यू प्रतिबंधात्मक नियंत्रण उपाय सुरू ठेवले आहेत. कामगारांच्या घरांना, निवासस्थानांना भेट देणे, जागृती करणे आदींसह जेथे पाणी साठले आहे, तेथे फॉगिंग करण्यात येत आहे.

पर्यटनावर परिणाम नाही : नाईक

गोव्यात कोविडचे बाधित वाढत असले, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. गोव्यातील पर्यटन उद्योजकांनी आणि संबंधित व्यावसायिकांनी घाबरायचे कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नाईक म्हणाले की, देशाने यापूर्वी या महामारीविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. गोव्याने खूप बिकट परिस्थितीतही या आजाराशी सामना केला आहे. कोविड प्रकरण हाताळण्यास गोव्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहेत, असे ते म्हणाले. दक्षिण गोव्यातील 'पांचजन्य' साप्ताहिकाने आयोजित केलेल्या 'सागर मंथन २.०' कार्यक्रमात ते बोलत होते.

पुन्हा लॉकडाऊन नाही, भीती अनाठायी

कोविडची प्रकरणे वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची भीती अनाठायी असल्याचेही ते म्हणाले. पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात ६५६ जणांना कोविड संसर्ग झाला आहे. त्यामुळे सक्रियबाधित ३७४२ वर पोहोचले आहेत. गोव्यात जेएएन व्हेरियंट सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटनावर त्याचा परिणाम होण्याची भीती पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री बोलत होते.

 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्याdengueडेंग्यू