शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

गोव्यातील मातब्बर राजकारण्यांमागे आजारपणांचं शुक्लकाष्ट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 11:25 IST

गोव्यातील मातब्बर राजकीय नेते, मंत्री, आमदार आजारी पडणे व मग त्यांना इस्पितळात दाखल करणे हे गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे.

पणजी : गोव्यातील मातब्बर राजकीय नेते, मंत्री, आमदार आजारी पडणे व मग त्यांना इस्पितळात दाखल करणे हे गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे. नेते आजारी पडले की, लगेच त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक मंदिरांमध्ये प्रार्थना करतानाही दिसून येत आहेत. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे आणि गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची प्रकृती आता सुधारली आहे.

80 व 90 च्या दशकात गोव्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले राणे यांना दोन दिवसांपूर्वीच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ इस्पितळात आणण्यात आले. तिथे त्यांना दाखल करून विविध वैद्यकीय चाचणी करण्यात आल्या. राणे यांना मूत्रसंसर्ग झाला होता. आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे प्रतापसिंग राणे यांचे पुत्र आहेत. विश्वजित यांनी रविवारी रात्री गोमेकॉ इस्पितळाला भेट दिली. आपले वडील राणे यांची प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली दोन दिवस ठेवले गेले. आज दुपारी त्यांना गोमेकॉ इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे मंत्री विश्वजित यांनी सोमवारी सकाळी लोकमतला सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे नुकतेच स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेऊन गोव्यात परतले आहेत. पर्रीकर यांची प्रकृती सुधारली आहे. ते सार्वजनिक सोहळ्यांची निमंत्रणं तूर्त स्वीकारणार नाहीत. आपल्यावरील उपचार सुरूच राहतील. आपण दिवसाला सहा ते सात तास शासकीय काम करीन, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत नुकतेच सांगितले. तुम्ही जास्त ताण घेऊ नका, असा सल्ला काही मंत्र्यांनीही पर्रीकर यांना दिला आहे.

गोव्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले दहा दिवस मुंबई येथील कोकीळाबेन इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. मंत्री मडकईकर यांची प्रकृती आता सुधारली आहे, ते पूर्वी व्हेंटीलेटरवर होते पण आता व्हेंटीलेटरवर नाहीत. ते अतिदक्षता विभागात आहेत. ते संवादही साधतात, असे त्यांचे बंधू धाकू मडकईकर यांनी लोकमतला सांगितले. धाकू हे गेले अनेक दिवस मंत्री मडकईकर यांच्यासोबत इस्पितळात होते.

काँग्रेसचे आमदार इजिदोर फर्नाडिस हेही आजारी आहेत. त्यांच्यावर नुकतीच मूत्रपिंडाची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. भाजपाचे आमदार कालरुस आल्मेदा यांना अडीच महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. ते त्या आजारातून बरे झाले आहेत पण अजून ते घरी विश्रंती घेत आहेत. गोव्याचे माजी उपसभापती विष्णू वाघ हे गंभीर आजारातून थोडे सावरले आहेत. ते घरीच असतात. दीड महिन्यापूर्वी गोव्याचे आणखी एक माजी मुख्यमंत्री तथा आमदार रवी नाईक हे दिल्ली दौ-यावर असताना अचानक आजारी पडले व त्यांना तत्काळ दिल्लीतील इस्पितळात दाखल करावे लागले होते. गोव्याचे एक माजी खासदार व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा गेल्या आठवडय़ात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा