शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अनंतकुमार हेगडेकडून राजघटनेचा अवमान - गोवा कॉंग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 22:34 IST

केंद्रीय रोजगार आणि कौशैल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या निधर्मी शब्दाच्या बेजबाबदार व वादग्रस्त वक्तव्याचा गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यत्र शांताराम नाईक यांनी निषेध केला आहे. एकतर त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेऊन त्यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी  केली आहे.  त्यांनी भारतीय राजघटनेचा अवमान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पणजी: केंद्रीय रोजगार आणि कौशैल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या निधर्मी शब्दाच्या बेजबाबदार व वादग्रस्त वक्तव्याचा गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यत्र शांताराम नाईक यांनी निषेध केला आहे. एकतर त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेऊन त्यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी  केली आहे.  त्यांनी भारतीय राजघटनेचा अवमान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाईक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात अनंतकुमार यांचे वक्तव्य हे जितके बेजबाबदार आहे तितकेच घटना विरोधी असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकात ब्राह्मण युवा परिषदेत बोलताना अनंत हेगडे यांनी निधर्मी म्हणजे ज्यांना आपल्या रक्ताचे नाते ठाऊक नाही असे लोक असल्याचे म्हटले होते. जे स्वत:ला निधर्मी म्हणवून घेतात त्यांना आपल्या पालकांची ओळख मिळालेली नाही असेही त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यामुळे ते त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मंत्रीपदाची शपथ घेताना हेगडे यांनी  भारतीय राजघटनेचा आदर राखण्याची ग्वाही दिली होती, परंतु आता ते  घटनेशीच द्रोह करीत आहेत. भाजपचे  आणखी एक नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निधर्मी हा शब्द बाबासाहेब आंबेडकर यांनी राजघटनेत सामाविष्ठ केलाच नव्हता असे खळबळजनक विधान केले आणि हा शब्द नंतर घटना दुरुस्ती आणून जोडला गेल्याचे म्हटले होते. घटनेत झालेल्या दुरुस्त्या या घटनेचा भाग ठरत नाही काय असा प्रश्न नाईक यांनी केला. हेगडे आणि स्वामी या दोघांनीही आपली वक्तव्ये मागे घ्यावीत आणि जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवा