पणजीतून काँग्रेसचा प्रबळ उमेदवार : लुईझिन

By admin | Published: November 16, 2014 01:28 AM2014-11-16T01:28:09+5:302014-11-16T01:30:00+5:30

पोटनिवडणूक : पारेख, फुर्तादो यांच्या नावाची चर्चा

Congressional candidate from Panaji: Louisiana | पणजीतून काँग्रेसचा प्रबळ उमेदवार : लुईझिन

पणजीतून काँग्रेसचा प्रबळ उमेदवार : लुईझिन

Next

पणजी : पणजी मतदारसंघात आता पोटनिवडणूक अटळ असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रबळ उमेदवार रिंगणात उतरविला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी म्हटले आहे.
पणजीचे आमदार असलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षणमंत्री बनल्यामुळे तसेच ते लखनौहून राज्यसभेचे सदस्य बनल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. लवकरच ते राजीनामा देण्याची शक्यताही आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रबळ उमेदवार उतरविण्यात येणार असल्याचे फालेरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उमेदवार कोण असेल ते योग्यवेळी जाहीर केले जाईल. पर्रीकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यावर उमेदवार निवडीची प्रक्रिया हाती घेतली जाईल. घटनात्मक प्रक्रिया पार पाडूनच उमेदवार निवडला जाईल, असे ते म्हणाले.
काँग्रेसतर्फे गेल्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकर यांच्या विरोधात लढलेले माजी महापौर यतीन पारेख, सध्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनाही काँग्रेसचे सांभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
सलग ४ वेळा निवडून येणारे पर्रीकर हे पणजीतील आतापर्यंत सर्वात प्रबळ उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या नंतर पणजीचे प्रतिनिधित्व कोण करणार या बद्दल अद्याप भाजपमध्येच उमेदवारी ठरलेली नाही. पणजीचा उमेदवार ठरविण्याचे सर्व अधिकार पक्षाने पर्रीकर यांनाच दिले आहेत. लोकांत मिसळणाऱ्या माणसालाच उमेदवारी दिली जाईल, असे पर्रीकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congressional candidate from Panaji: Louisiana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.