शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात काँग्रेसला तरुण प्रदेशाध्यक्ष मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 14:47 IST

गोव्यात काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत पण प्रदेशाध्यक्ष निवडला गेलेला नाही. काँग्रेससाठी गोव्यात प्रथमच एखादा तरुण प्रदेशाध्यक्ष दिल्लीहून नियुक्त केला जाईल अशी माहिती मिळाली आहे.

पणजी- गोव्यात काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत पण प्रदेशाध्यक्ष निवडला गेलेला नाही. काँग्रेससाठी गोव्यात प्रथमच एखादा तरुण प्रदेशाध्यक्ष दिल्लीहून नियुक्त केला जाईल अशी माहिती मिळाली आहे.

गोव्यात गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसला तरुण प्रदेशाध्यक्ष मिळालाच नाही. पन्नाशी आणि साठी ओलांडलेलेच प्रदेशाध्यक्ष आतापर्यंत गोव्यातील काँग्रेसजनांच्या वाट्याला आले. आता प्रथमच गिरीश चोडणकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, यतिश नायक किंवा अन्य एखाद्या तरुण कार्यकर्त्याची नियुक्ती केली जाऊ शकते. काँग्रेसच्या आमदारांमध्येही तशीच चर्चा सुरू आहे. स्वत: रेजिनाल्ड, चोडणकर व यतिश नायक हे या पदासाठी इच्छुकही आहेत. 

येत्या काही दिवसांत राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गोव्यासाठी नवे प्रदेशाध्यक्ष गांधी यांच्याकडूनच नियुक्त केले जाणार आहेत. प्रदेश काँग्रेस समितीवर निवडून आलेल्या सर्व समित्यांनी एका ठरावाद्वारे तसा अधिकार राहुल गांधी यांना दिला आहे.गोव्यात काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या मागे सरकारने पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे बाबू यांची अटक चुकली आहे. काँग्रेसचे अन्य एक ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मागे ईडीच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लाभले आहे. ईडीने कामत यांची बरीच मालमत्ताही नुकतीच जप्त केली आहे.  एकंदरीत गोव्यात काँग्रेसच्या सर्वच आमदारांचे मनोधैर्य सध्या खचलेले आहे. अशावेळी काँग्रेसला नवे बळ प्राप्त करून देण्यासाठी गोव्यातील पर्रीकर सरकारशी निधड्या छातीने लढू शकेल अशा व प्रतिमा डागाळलेली नसेल अशाच व्यक्तीची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

यापूर्वीच्या काळात  निर्मला सावंत, रवी नाईक, लुईझिन फालेरो, जॉन फर्नांडीस आदींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेले आहे. सध्या तात्पुरते प्रदेशाध्यक्ष पद माजी खासदार शांताराम नाईक यांच्याकडे आहे.