शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 19:13 IST

गोव्यातील काँग्रेस पक्षाकडून राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची स्थिती अत्यंत नाजूक बनलेली आहे. मनोहर पर्रीकर यांचा रक्तदाबही वारंवार कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या सर्व आमदारांना गोव्यातच राहण्याची सूचना केली आहे. दुस-याबाजूने विरोधी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. सरकारमधील सहा बिगरभाजपा मंत्री व आमदार संघटीत झाले असून पुढील मुख्यमंत्री ठरवताना आपल्याला विश्वासात घ्यायला हवे म्हणून या गटाने रणनीती तयार केली आहे.मनोहर पर्रीकर यांच्याविषयी दिवसभर खूप अफवा पसरल्या. सकाळी मनोहर पर्रीकर यांची स्थिती खूप बिघडली होती. त्यांचा रक्तदाब एकदम खाली आल्यानंतर गोमेकॉ इस्पितळाच्या काही डॉक्टरांनी त्यांच्या घरी धाव घेतली. तसेच भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हेही मनोहर पर्रीकर यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी जाऊन आले. मनोहर पर्रीकर यांची स्थिती स्थिर आहे, असा दावा कुंकळ्ळ्य़ेकर यांनी सकाळी केला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही मनोहर पर्रीकर यांची स्थिती स्थिर असल्याचे सांगितले. मात्र. मनोहर पर्रीकर यांची स्थिती बिघडत चालल्याची कल्पना भाजपाच्या कोअर टीमला आली. सायंकाळी पक्षाचे संघटन मंत्री  सतिश धोंड यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली.

भाजपाकडे तेरा आमदार आहेत. भाजपाने आपल्या अकरा आमदारांची एकत्र बैठक घेतली. एक मंत्री  विदेशात आहे. कुणीच भाजपा आमदाराने या दोन-तीन दिवसांत गोव्याबाहेर जाऊ नये अशी सूचना सर्व आमदारांना करण्यात आली आहे. मनोहर पर्रीकर सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई, रोहन खंवटे, विनोद पालयेकर, गोविंद गावडे, जयेश साळगावकर व आमदार प्रसाद गावकर हे सहाजण एकत्र आले. त्यांनी मनोहर पर्रीकर यांची स्थिती जाणून घेण्यासाठी मनोहर पर्रीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. मनोहर पर्रीकर वेन्टीलेटरवर आहेत.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपालांना पत्र पाठवून दिले आहे. काँग्रेसकडे बहुमत असून विधानसभा विसर्जित केली जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे. राष्ट्रपती राजवट लागू न करता आम्हाला सरकार स्थापनेची संधी दिली जावी, अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे. काँग्रेसने राज्यपालांकडे प्रत्यक्ष भेटीसाठीही वेळ मागितली आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा