शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या मंत्र्याविरुद्ध काँग्रेस पक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 10:37 IST

गोव्याचे आरोग्य मंत्री तथा भाजपाचे आमदार विश्वजित राणे यांना अपात्र ठरविले जावे म्हणून गोव्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्याचे ठरवले आहे.

पणजी - गोव्याचे आरोग्य मंत्री तथा भाजपाचे आमदार विश्वजित राणे यांना अपात्र ठरविले जावे म्हणून गोव्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्याचे ठरवले आहे.

विश्वजीत राणे हे अलिकडेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वाळपई मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. तत्पूर्वी ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते पण निवडून येऊन लगेच त्यानी आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी विश्वजित राणे यांनी केलेली कृती ही त्यांच्या अपात्रतेला कारण ठरते असे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला त्यावेळी विश्वजित यानी विरोधात मतदान करायला हवे होते पण ते मतदानाप्रसंगी सभागृहात मुद्दाम अनुपस्थित राहिले असे काँग्रेसचे म्हणणे आहे. अगोदर विश्वजित यांनी व्हीपचे पालन केले नाही, मग त्यानी आमदारकीचा राजीनामा दिला असा दावा करून काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात विश्वजितविरूद्ध अपात्रता याचिका सादर केली होती. न्यायालयात त्यावर काही महिने सुनावणी झाली. विश्वजितविरूद्ध विधानसभेचे  सभापती प्रमोद सावंत यांच्यासमोरही अपात्रता याचिका आहे. त्यामुळे न्यायालयाने याचिका फेटाळली. सभापतींसमोरील याचिकेवर सभापतीनी अजून निवाडा दिलेला नाही.

काँग्रेसने आता उच्च न्यायालयाच्या निवाड्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा प्रभारी चेल्लाकुमार यानी याविषयीचे सूतोवाच केले आहे. तथापि, आपला न्याय संस्थेवर पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया मंत्री विश्वजित यानी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे काही आमदार घोटाळ्यांमध्ये अडकले असून त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या  विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहे असे विश्वजित म्हणाले.