शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अमली पदार्थांची सर्रास विक्री : काँग्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 15:28 IST

भाजपा सरकारवर काँग्रेसचे गंभीर आरोप

म्हापसा : गोव्यात खास करुन किनारी भागात अमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक किनारे अमली पदार्थांच्या विक्रीचे केंद्र बनले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. सरकार आणि पोलिसांच्या आशिर्वादाने बिनबोभाटपणे हा व्यवसाय सुरु असून बेकारी वाढल्याने तरुणसुद्धा या व्यवसायाकडे आकर्षित होऊ लागल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या अनेकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून फक्त अमली पदार्थ, कॅसिनो, जुगार तसेच इतर गैरप्रकारांकडे आकर्षित होणारे पर्यटकच गोव्यात येवू लागले असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. गोव्यात खास करुन उत्तर गोव्यातील किनारी भागात अमली पदार्थाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचा आरोप आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला. रात्री उशीरापर्यंत होणाऱ्या पार्ट्यातून तसेच किनाऱ्यावरील शॅकातून खुलेआम पद्धतीने अमली पदार्थाची विक्री किनारी भागात केली जाते, असंही त्यांनी म्हटलं. कळंगुटचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी पणजी तसेच वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेला पोलिसांची नावे जाहीर करण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यांची नावे जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. मागील काही महिन्यांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा, चरस पकडला आहे. मात्र हा साठा हलक्या प्रतीचा होता. त्यामुळे उच्च प्रतीचे ड्रग्स पोलिसांकडून पकडले जात नसून हे ड्रग्स थेट विक्रीसाठी पुरवले जाते, असा आरोपही रेजिनाल्ड यांनी यावेळी केले. हल्लीच्या काळात पोलिसांनी कारवाई करुन टाकलेल्या छाप्यात किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करुन मोठ्या ड्रग्स माफीयांवर दुर्लक्ष करुन त्यांना सोडून दिले जाते. यातून पोलीस तसेच ड्रग्स माफियांमध्ये असलेले हितसंबंध स्पष्ट दिसून येत असल्याचे ते म्हणाले. लहान विक्रेत्यांवर कारवाई करुन भाजपा लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत  असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.  

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थ