शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रपतींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:46 IST

ग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यातील समस्यांवर गंभीर चर्चा केली.

पणजी: मागील १०० दिवसांपासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्याचा दावा करून काँग्रेस विधीमंडळ मंडळाने राष्ट्रपतीला साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे. कवळेकर यांनी आपल्या विधानसभेतील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यातील समस्यांवर गंभीर चर्चा केली.  तसेच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपाय योजनेचेही प्रस्ताव तयार ठेवले आहेत. पहिली समस्या म्हणजे गोव्याला मुख्यमंत्री नसणे आणि ती सोडविण्यासाठी काँग्रेसचे आमदार राष्ट्रपतीना भेटणार आहेत. अद्याप तारीख ठरली नसली तरी लवकरच भेटणार आहेत असे त्यांनी सांगितले. खाण बंदीमुळे लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. राज्यात आणि केंद्रातही भाजप सरकार असून सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. या सरकारने खाण प्रकरणात तोडगा काढल्यास सरकारचा काँग्रेसचा पाठिंबा  राहील. परंतु सरकार काही करतच नाही हे खरे दु:ख आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फेच काही तरी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू असून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही घेतला आहे अशी माहिती कवळेकर यांनी दिली. यावर विचार विनिमय करण्यासाठी प्रतापसिंग राणे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती काढण्यात आली आली असून बुधवारी त्यांची बैठक होणार आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले ४ हजार रुपये बेकारी भत्ता देण्याचे आश्वासनाची पूर्ती करण्याची ही वेळ असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. ही योजन त्वरीत लागू करण्याची मागणी त्यांनी केली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला आमदार सुभाष शिरोडकर यांच्यासह बहुतेक सर्व आमदार उपस्थित होते. आमदार इजिदोर फर्नांडीस हे आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा