शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांचा इशाऱ्यानंतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:34 IST

प्रदेशाध्यक्ष चोडणकर तसेच अन्य काँग्रेसी नेत्यांनी नोटीस मिळाल्यानंतर सरकारच्या हुकूमशाही

पणजी : म्हादईच्या प्रश्नावर काँग्रेसकडूनइफ्फीत निदर्शने, आंदोलनं होण्याची शक्यता गृहीत धरून आगशी पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह पक्षाच्या काही युवा नेत्यांना नोटिसा बजावून शांतता भंग न करण्याचा इशारा दिला आहे. आगशी पोलीस निरीक्षकांनी बजावलेल्या नोटिशीत इफ्फी काळात कोणताही कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये, शांतता राखावी, निदर्शने आंदोलने करू नयेत, असे काँग्रेसी नेत्यांना बजावले आहे. गोव्यात आज 50 व्या ईफ्फी सोहळ्याचे उद्घाटन होत आहे. पुढील दहा दिवस हा सोहळा चालणार आहे. प्रदेशाध्यक्ष चोडणकर तसेच अन्य काँग्रेसी नेत्यांनी नोटीस मिळाल्यानंतर सरकारच्या हुकूमशाही भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार जनतेला आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे. कळसा-भंडुरा प्रकल्पाला ईसीच्याबाबतीत मुभा देणारे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला दिल्यानंतर गोव्यात गेले काही दिवस खळबळ उडाली आहे. या प्रश्नावर जनमानसात तीव्र संताप आहे. विरोधी काँग्रेस पक्षाने या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले असून केंद्रात पर्यावरण मंत्री असलेले प्रकाश जावडेकर माहिती प्रसारण खात्याचेही मंत्री आहेत. इफ्फीच्या उद्घाटनासाठी मंगळवारी रात्री उशीरा ते गोव्यात दाखल झाले. 

जावडेकर यांचा निषेध करण्यासाठी इफ्फीच्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलनाची शक्यता आहे. तसा इशारा चोडणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला होता. कर्नाटकला मुभा देणारे पत्र मागे घेणारे पत्र घेऊनच जावडेकर यांनी गोव्यात यावे, अन्यथा येऊ नये. तसेच मुख्यमंत्री किंवा सरकारी यंत्रणेनेही जावडेकर यांचे स्वागत करू नये, अशी मागणी केली होती. कर्नाटकने पाणी वळविल्यास गोव्याच्या जनजीवनावर परिणाम होईल. कृषी क्षेत्रासाठी, औद्योगिक वापरासाठी पाणी मिळणार नाही. जनतेचे पाण्याविना हाल होतील, अशी भावना आहे. 

काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जोपर्यंत कर्नाटकला याबाबत मुभा देणारे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालय मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन शांत होणार नाही, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही बजावले आहे. म्हादई प्रश्नावर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी समिती स्थापन केली असली तरी आंदोलकांनी ही समिती स्वीकारलेली नाही. कर्नाटकला दिलेले पत्र आधी मागे घ्या, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फीcongressकाँग्रेस