शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने रचले कुभांड; मंत्री माविन गुदिन्हो यांचा 'त्या' नेत्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:16 IST

न्यायालयाच्या निकालानंतर दाबोळी मतदारसंघातील गुदिन्हो समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : काँग्रेस पक्षात असताना मी मुख्यमंत्री होऊ शकतो, असे लक्षात आल्याने काही नेत्यांनी मला अडकवण्यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांना वीज अनुदान घोटाळा झाल्याचे सांगत खोटी कागदपत्रे दिली. पर्रीकर यांनी माझा काहीच दोष नसल्याचे तेव्हा सांगून काही कांग्रेस नेत्यांनीच तुझ्याविरोधात मला कागदपत्रे पुरवली, असे सांगितल्याची माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

काहीच दोष नसताना माझ्यावर विनाकारण २७ वर्षे वीज अनुदानात घोटाळा केल्याचा खोटा खटला चालला. याचा त्रास सोसावा लागला. कार्यकर्ते माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिल्याने आणि देवाच्या कृपेनेच मला इतक्या वर्षांनंतर न्यायालयाने निर्दोष जाहीर केले. याचा मला मोठा आनंद झाला असे ते म्हणाले. सोमवारी (दि. २५) विशेष न्यायालयाने १९९८च्या कथित वीज अनुदान घोटाळ्यातून तत्कालीन वीजमंत्री आणि विद्यमान पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना निर्दोष मुक्तता दिली. 

न्यायालयाच्या निकालानंतर संध्याकाळी दाबोळी मतदारसंघातील गुदिन्हो समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नवेवाडे येथील गुदिन्हो यांच्या कार्यालयात त्यांचे पुष्पहार घालून आणि फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

पत्रकारांशी बोलताना गुदिन्हो म्हणाले की, '२७ वर्षांनंतर मला न्याय मिळाला. कोणत्याच प्रकारचा घोटाळा झाला नसतानाच माझ्याविरोधात वीज अनुदानात घोटाळा झाल्याचा खोटा खटला घालण्यात आला होता. त्यावेळी पर्रीकर यांना मी काहीच केले नसताना माझ्याविरोधात हे प्रकरण का नोंद केले? असे विचारले. तेव्हा पर्रीकर यांनी, तू काहीच केले नसल्याचे मान्य करत तुझ्याच काही काँग्रेस नेत्यांनी तू मुख्यमंत्री होशील अशा भीतीतून कागदपत्रे आणून दिल्याची माहिती दिली होती.

माझ्याविरोधात काही काँग्रेस नेत्यांनी षडयंत्र रचले. मला विनाकारण संकटात टाकले. पण, कार्यकर्ते सतत माझ्याबरोबर ठामपणे राहिले. त्यामुळे मी आणखी शक्तिशाली झालो. विरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केलेल्या नेत्यांचा मी आभारी आहे.

गुदिन्हो म्हणाले की, 'मी काहीच चुकीचे केलेले नाही. देवाने माझ्यावर कृपा करून यातून निर्दोष सोडवले. मी गेली ४० वर्षे जनतेची सेवा करत आहे. समर्थक, कार्यकर्ते आणि मतदार माझ्याबरोबर आहेत. जे लोक सोबत राहिले त्यांचे आभार. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण