शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:34 IST

भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस असल्याचा काँग्रेसचा दावा

पणजी : राज्य सरकार अस्थिर केलं जात असल्याचा सत्ताधारी भाजपचा आरोप काँग्रेस पक्षानं फेटाळून लावला आहे. सत्ताधारी भाजपमध्येच धुसफूस असल्यानं त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.काँग्रेसच्या आमदारांनी नुकतीच राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं. सरकार चालत नसल्यानं गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली होती. त्यावर भाजपने टीका केली. राज्यात पीडीएविरोधी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्ष चिथावणी देत आहे, अशीही टीका भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आणि इतरांनी केली होती. गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील एक मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तर पीडीएविरोधी आंदोलनातून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा करून यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. विरोधी पक्षच पीडीएविरोधी आंदोलनाच्या मागे आहे, असे सरदेसाई म्हणाले होते. भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक गुरुवारी पणजीत पार पडली. त्या बैठकीत एक राजकीय ठराव मांडून संमत केला गेला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारांसाठी अमेरिकेत आहेत. अशावेळी गोव्यात विरोधक सरकार अस्थिर करू पाहत आहेत आणि त्यांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दांत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. काँग्रेसनं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी 'लोकमत'शी सांगताना म्हटलं. 'पर्रीकर यांच्या आजारपणामुळे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जेव्हा कमी करून तीन दिवसांवर आणला गेला, तेव्हाही काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना सहकार्य केलं. भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस आहे आणि त्यामुळे त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं असावं,' असं कवळेकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा