शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या भाजपा नगरसेवकांचा जीवाचा गोवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:04 IST

मॉलमध्ये शॉपिंग; मंदिरांना भेटी, समुद्र किनाऱ्यांवर फेरफटका

पणजी : सांगलीच्या महापौर, उपमहापौरांची सोमवारी निवड होणार असून नगरसेवकांमध्ये फूट पडू नये म्हणून भाजपाच्या ४२ नगरसेवकांना गोव्यात आणण्यात आले आहे. ते जीवाचा गोवा करत आहेत. पर्वरी येथील मॉल दी गोवामध्ये जाऊन शॉपिंगचा त्यांनी आनंद घेतला तसेच मिरामार, दोनापावलच्या समुद्रकिनाºयांना भेटी देण्याबरोबरच मंगेशी येथील प्रसिद्ध मंगेशी मंदिरातही ते गेले होते. ४२ नगरसेवकांमध्ये सांगलीचे भावी महापौर व उपमहापौरही आहेत. काही सहकुटुंब गोव्यात आले आहेत. गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे, तेथे गोव्यातील भाजपा पदाधिकाºयांचीही नजर आहे. महाराष्ट्रातून येऊन त्यांना फोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणूनही काळजी घेतली जात आहे. सर्व नगरसेवक एकाच बसमधून कुटुंबासह फिरत आहेत. एकट्या नगरसेवकाला कुठे सोडले जात नाही. शुक्रवारी या नगरसेवकांनी पणजी-म्हापसा महामार्गावर असलेल्या मॉल दी गोवा या प्रसिद्ध मॉलमध्ये जाऊन खरेदी केली. मंदिरे, मॉल, चर्चेस आणि सागरकिनारे याव्यतिरिक्त दूर कुठे जाऊ नका, असा संदेश गोव्यातील भाजपा नेत्यांनी नगरसेवकांना दिलेला आहे. त्यांचा निवास असलेल्या हॉटेलचे नाव गुप्त ठेवले आहे. रविवारी हे नगरसेवक गोव्याचा निरोप घेतील. गोव्यात कपडे, भेटवस्तू व कुटुंबीयांसाठी त्यांनी खरेदी केली.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाSangliसांगली