शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मुख्यमंत्र्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार; खाण कंपन्यांना चपराक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 17:57 IST

धक्कादायक बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त करून खाणपट्ट्यात जेव्हा ही अंदाधुंदी चालली होती, तेव्हा सरकार अक्षरश: अस्तित्वात नव्हते.

-  राजू नायकखाणी सुरू करण्याची प्रमोद सावंत सरकारला अशिष्ट घाई झाली आहे. परंतु ते सरकार सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागेल या आशेवर कुठे थांबलेय ?गेले काही महिने गोव्यात खाणपट्ट्यात बेसुमार खाणकाम वाहतूक चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने, काढून ठेवलेला माल उचलण्यास खाण कंपन्यांना मान्यता दिली होती. रॉयल्टीही भरलेला माल तुम्ही उचलू शकता, असे न्यायालयाचे निर्देश होते. परंतु जेव्हा राज्य सरकारची खाण कंपन्यांशी मिलीभगत असते, तेव्हा ड्युटी भरलेला व नव्याने काढलेला माल यातील फरक कोण तपासणार? न्या. एम. बी. शहा यांनी असे अनेक गैरव्यवहार आपल्या अहवालातून चव्हाट्यावर आणले आहेत, ज्यात बहुतांश खाण कंपन्या गुंतल्या आहेत; ज्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास सरकारला दारुण अपयश आले आहे.लक्षात घेतले पाहिजे की सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वी खाणी व खनिजाची वाहतूक करण्यास बंदी लादली होती. परंतु न्या. एस. ए. बोबडे यांनी सहा महिन्यांत ड्युटी भरलेले खनिज उचलण्यास खाण कंपन्यांना सांगितले होते. या सहा महिन्यांचा कालावधी गेल्या बुधवारी संपण्यापूर्वी खाणींवर एकच घाई चालली असल्याचे दृश्य लोकांना दिसले.धक्कादायक बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त करून खाणपट्ट्यात जेव्हा ही अंदाधुंदी चालली होती, तेव्हा सरकार अक्षरश: अस्तित्वात नव्हते. म्हणजे, खाण खात्यात कर्मचारी आहेत की नाहीत, खाणींवर कोण देखरेख ठेवतोय, संचालकांनी खाणींना किती वेळा भेट दिलीय व ट्रकांची वाहतूक व प्रत्यक्ष नव्याने उत्खनन चालले असल्यास त्याच्यावर नजर ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात आहे का, कोणाला काहीच माहीत नाही. त्याचाच लाभ खाण कंपन्यांनी घेतला असण्याची शक्यता आहे. आता गोवा फाऊंडेशनचे पर्यावरणवादी प्रमुख क्लॉड आल्वारीस म्हणताहेत की त्यांनी आरटीआयद्वारे सरकारकडे तपशिलाची मागणी केली आहे. ते असेही म्हणाले, ‘‘खाण कंपन्यांनी चोरले व राज्य सरकारचे प्रतिनिधी त्यात खुलेआम सामील होते!’’कोविड काळात प्रमोद सावंत सरकारने खाण कंपन्यांना उघडपणे पाठिंबा व अभय दिल्याचा आरोप गोव्यात होत असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.त्यात भर म्हणून आता प्रमोद सावंत गोव्यात पूर्ववत खाणी सुरू करण्याच्या प्रयत्नात असून तसे निवेदन त्यांनी जाहीरपणे दिले आहे. सर्वोच्च न्यायालय खाणी सुरू करण्यास मान्यता देईल अशी मला आशा वाटते, असे ते म्हणाले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या खाण कंपन्यांना खुलेपणाने पाठिंबा देण्याच्या प्रवृत्तीविरोधात क्लॉड आल्वारीस यांनी नुकतीच पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. त्या पत्रात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने खाणींच्या लिजेस कालबाह्य असल्याच्या कारणास्तव त्या सर्व बंद केल्या व काढून ठेवलेला मालही नेण्यास बंदी लागू केली होती. त्यानंतर मोदी सरकारने लिलावाशिवाय नव्याने लिजेस दिल्या जाऊ नयेत, असा कायदा केला आहे व भाजपाचे निवडणूक जाहीरनाम्यातील वचन आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत:च्या स्वार्थासाठी या तत्त्वांना व कायद्याला हरताळ फासत असून ते खाण कंपन्यांना फुकटात लिजेस देण्याची तरफदारी करतात.खाण कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या रिव्ह्यू पिटिशनलाही सरकारचा उघड पाठिंबा असून खाण कंपन्यांनी अद्याप त्याची प्रतही गोवा फाऊंडेशनला दिलेली नाही. क्लॉड यांच्या मते, आता हा अर्ज सर्वोच्च न्यायालयात वेगळ्या खंडपीठाकडे पाठविल्यामुळे त्यावर लवकर सुनावणी अपेक्षित नाही. गोवा फाऊंडेशनने या प्रकरणाचा निर्णय एकतर्फी लागू नये म्हणून त्याला १४० जणांचे आपले प्रतिज्ञापत्र जोडून लिजेस लिलावाद्वारेच दिल्या जाऊ शकतात, असा दावा केला आहे. गोव्याला महसूल न देता या व्यवसायातून हजारो कोटी मिळविणाऱ्या खाण कंपन्यांच्या उत्साहावर गोवा फाऊंडेशनच्या प्रतिज्ञापत्रामुळे विरजण पडले असून खाण कंपन्यांच्या ओंजळीने पाणी पिणाºया नेत्यांनाही हात चोळीत बसावे लागले आहे. गोव्यातील अनेक राजकारणी प्रत्यक्ष खाण व्यवसायात आहेत!

टॅग्स :goaगोवा