शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 10:26 IST

घन कचऱ्यावरून आस्थापनांना सुनावले; पिसुर्ले येथे औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, होंडा : 'स्वच्छ गोवा, हरित गोवा' हे स्वप्न साकार करण्यासाठी विविध प्रकारच्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया झाली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. औद्योगिक वसाहतीत निर्माण होणाऱ्या हानिकारक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. यापुढे उघड्यावर धोकादायक कचरा टाकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत गुरुवारी फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड कंपनीच्या राज्यातील पहिल्या औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, कचरा व्यवस्थापन सल्लागार पद्मश्री डॉ. शरद काळे, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव महेश शंभू, संचालक डॉ. स्नेहा गित्ते, किरण चिपकर, कंपनीचे मालक तथा राज्यसभेचे माजी खासदार अजय संचिती, संचालक परम संचिती मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यातील युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच. शिवाय सामाजिक विकासाला चालनाही मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी घेऊन विविध प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी झटावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, गोवा कचरा व्यवस्थापन व्यवस्थापकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव महेश शंभू यांनी कचरा व्यवस्थापन संबंधी माहिती दिली. कंपनीचे संचालक परम संचेती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी हिने केले तर हसन हुसेन यांनी आभार मानले.

दरम्यान, देशातील ९ राज्यात कंपनीचे कचरा व्यवस्थापन करण्याचे प्रकल्प आहेत, त्यात महाराष्ट्रातील रांजणगाव देशात येथील सर्वात्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. कंपनीचे सर्व कामकाज शासकीय नियमानुसार चालत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे माजी खासदार अजय संचेती यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'एसएमएस' या ग्रुपचे अध्यक्ष अजय संचेती यांनी हा प्रकल्प गोव्यात आणला, त्यामुळे गोवा सरकारच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.या प्रकल्पामुळे राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या कंपन्यांतील घातक घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा कचरा प्रकल्प उभारून या कंपनीने गोव्यात १०० वर्षे कचरा व्यवस्थापन करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सर्व औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या कंपन्यांनी आपला औद्योगिक कचरा या प्रकल्पाला पुरवावा.

कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखावा : राणे

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प उभारण्यात आल्याने याचा या परिसराला फायदा होणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, या कार्यक्रमास पिसुर्ले पंचायत मंडळ उपस्थित राहिलेले नाही. लवकरच कंपनी व्यवस्थापन व पंचायत मंडळ यांच्यात समझोता घडवून आणू, असेही दिव्या राणे म्हणाल्या. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत