शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील जमीन रुपांतराच्या चौकशीसाठी पाचजणांची समिती, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 18:31 IST

Committee of five to inquire into the conversion of land in Goa

मडगाव -  2021 च्या प्रादेशिक आराखडय़ाचा फायदा घेऊन राजकारण्यांनी मोठय़ा प्रमाणावर जमिनीचे रुपांतर केल्याचा आरोप होत असतानाच गोव्यातील चर्च संस्थेनेही अशाप्रकारे जमीन रुपांतर केली आहे असा आरोप होऊ लागल्याने गोव्यात वातावरण तापले आहे. याच पाश्र्र्वभूमीवर नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी यासंबंधी चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.सोमवारी सरदेसाई यांनी हा आदेश जारी केला. सध्या प्रादेशिक आराखडा कार्यान्वीत करण्यासाठी जी पाच तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. याच समितीकडे या जमीन रुपांतराच्या आरोपाचीही चौकशी दिली असून या समितीने एका महिन्यात आपला अहवाल द्यावा असे मुख्य नगरनियोजकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.या आरोपासंदर्भात कुणाकडेही माहिती असल्यास त्यांनी ती या समितीला द्यावी असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. 2021 च्या आराखडय़ात मोठय़ा प्रमाणावर जमिनीचे रुपांतर होणार असल्याचा दावा करुन हा आराखडा रद्द करावा अशी मागणी गोव्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांची छत्र संघटना असलेल्या ‘गोंयचो आवाज’ या संघटनेने केली आहे. मागच्या शुक्रवारी मडगावात झालेल्या जाहीर सभेत नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्यासह 14 राजकारण्यांनी या आराखडय़ाचा फायदा घेऊन मोठय़ा प्रमाणावर जमिनीचे रुपांतर केले असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या आंदोलनाला पाठिंबा देणा:या चर्चनेही साडेपाच लाख चौ.मी. जमिनीचे रुपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला होता. मात्र त्यातील 1.30 लाख चौ.मी. जमिनीचे रुपांतर करण्यात आले अशी माहिती पुढे आली आहे. या दोन्ही बाजूने होत असलेल्या आरोपांनी सध्या गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गोंयच्या आवाजने केलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा काही राजकारण्यांनी केला असून या संघटनेने जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात बदनामी केल्याचा खटला दाखल करण्याचा इशाराही भाजपचे आमदार निलेश काब्राल यांच्यासह माजीमंत्री दीपक ढवळीकर व माजी आमदार नरेश सावळ यांनी दिला आहे.

 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार