शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेतून नारळ आयातीचा निर्णय गोव्याकडून मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 14:05 IST

श्रीलंकेतून गोव्यात नारळाची आयात करण्यात येईल अशा प्रकारचा विचार कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीरपणे मांडला तरी, अशा प्रकारे आयात करणे हे सरकारवर दोष येणारे ठरेल याची कल्पना लगेच सरकारला आली. यामुळे सरकारने प्रस्ताव आता गुंडाळला आहे.

पणजी : श्रीलंकेतून गोव्यात नारळाची आयात करण्यात येईल अशा प्रकारचा विचार कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीरपणे मांडला तरी, अशा प्रकारे आयात करणे हे सरकारवर दोष येणारे ठरेल याची कल्पना लगेच सरकारला आली. यामुळे सरकारने प्रस्ताव आता गुंडाळला आहे.गोव्यात नारळाचे दर प्रचंड वाढले आहेत. छोटे नारळ वीस रुपये दराने विकले जात आहेत. किंचित मोठे नारळ 25 रुपये तर एकदम मोठय़ा आकाराचे नारळ 35 ते 40 रुपये दराने विकले जात आहेत. नारळाचे दर प्रचंड वाढलेले असताना सरकार लोकांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही अशी टीका करत काँग्रेसच्या महिला शाखेने अलिकडेच आंदोलन केले. आंदोलनावेळी महिला काँग्रेसने कमी दरात नारळ विक्री केली व ग्राहकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला. याच काळात कृषी मंत्री सरदेसाई यांनी गोव्यात नारळाचा तुटवडा असल्याने सरकार श्रीलंकेमधून नारळाची आयात करील असे विधान केले. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर व इतरांनी टीका केली. नारळाच्या आयातीची गरज नाही, सरकारचा त्यामागिल हेतू गोव्यातील माडाच्या बागायती संपुष्टात आणून तेथील जमिनींचे सेटलमेन्ट झोनमध्ये रुपांतर करावे असा असावा असे चोडणकर यांनी म्हटले होते. त्यावर चोडणकर यांच्या मानसिकतेवर मंत्री सरदेसाई यांनी टीका करत प्रत्युत्तर दिले होते.या सगळ्य़ा वादात सरकारने अनुदानित दराने राज्यातील काही दालनांमधून नारळ विक्री सुरू केली. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने पहिल्या टप्प्यात अवघ्याच दालनांमधून नारळ विक्री सुरू केली आहे. राज्यभरातील सर्व दालनांमधून नारळ विक्रीचा विस्तार करण्याचा गोवा फलोत्पादन विकास महामंडळाचा प्रस्ताव आहे. दालनांमधून कमी दराने नारळ विक्री करण्यासाठी मुळात जास्त संख्येने नारळ जलदगतीने उपलब्ध होणो गरजेचे आहे. एकूण एक लाख नारळ सरकारने तत्काळ विकत घ्यावे असा प्रयत्न महामंडळाने चालवला आहे. स्थानिक व अन्य ट्रेडर्सकडून गोवा बागायतदार संस्था व गोवा फलोत्पादन महामंडळ ही नारळ खरेदी करणार आहे.दरम्यान, श्रीलंकेतून नारळाची आयात करण्याचा प्रस्ताव आम्ही मागे घेतल्याचे कृषी मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. आयात करण्याचा विचार आम्ही प्रारंभी केला होता पण आता गरज वाटत नाही असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा